कोळसा वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकमध्ये चालकाचा मृत्यु

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ आक्टो.) : वेकोलीच्या उकणी कोळसाखाणी च्या काट्या जवळ कोळशाचा काटा करण्याकरिता उभ्या असलेल्या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना काल 30 सप्टेंबरला उघडकीस आली. उकणी कोळसाखाणीतून साई वर्धा पॉवर प्लॉंट मध्ये कोळशाची वाहतूक कर्णार्या MH 34 AB 1082 या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळून आल्याने खदान परिसरात चांगलीच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील रहिवाही असलेला रामदेव नामक ट्रक चालक माजरी येथे रहात असल्याचे कळते. तेथीलच कोळसा वाहतूकदाराकडे तो ट्रक चालक म्हणून कामाला होता. काल रात्री उकणी कोळसा खदानीतून कोळसा भरुन तो साई वर्धा पॉवर प्लॉंट ला जाणार होता. फास्ट ट्याग काम करत नसल्याने त्याच्या गाडीचा काटा होत नव्हता. त्यामूळे त्याने गाडीचा काटा करण्याकरिता काट्या जवळील खुल्या जागेत ट्रक उभा केला. पण बराच वेळ होऊनही ट्रक जागचा हलला नसल्याने काही ट्रक चालकांनी ट्रकमध्ये जाऊन बघितले असता सदर ट्रक चालक हा निपचित पडून दिसला. काहींनी त्याला हलवुन व आवाज देऊन पाहिले. पण काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने खाण प्रबंधकांना महीती देण्यात आली. तो मृत पावल्याचा अंदाज बांधत ट्रक मालकाला कळविण्यात आले. त्याचा मृत्यू नेमका कसा व कशाने झाला हे अद्यापही कळू शकलेले नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल की गुलदस्त्यातच राहील ही चर्चा खदान परिसरात ऐकायला मिळत होती. सध्या कोळसा वाहतुकीची मोठी स्पर्धा सुरु असून वाहनाच्या जास्तीत जास्त चकरा लागाव्या याकरिता चालक व मालक दोघांचीही धडपड चाललेली असते. ही जीवघेणी स्पर्धा कधी कुणाच्या जिवावर बितेल याचा नेम राहिलेला नाही. वेकोलीच्या रुग्णवाहिकेने मृतदेह कोळसा खदानीतून हलविण्यात आला आहे.
कोळसा वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकमध्ये चालकाचा मृत्यु कोळसा वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकमध्ये चालकाचा मृत्यु Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.