सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
वरोरा, (०१ आक्टो.) : शहरातील मालवीय वारडातिल दोन अल्पवयीन मुली दि.२७.सप्टेंबर ला सकाळीपासून बेपत्ता असुन, त्यांच्या पालकांनी मुलींना पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चंद्रपूर येथील एलसीबीने वेगाने तपासाची चक्रे फिरवून त्या मुलींना पुणे येथून शोधून काढण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, च्या दोन्ही मुलींना घेवून एलसीबीचे पथक पुणे येथून निघाले असून, आज शुक्रवारी सकाळी वरोरा येथील ते वरोऱ्यातील दाखल होणार आहेत. बेपत्ता झालेल्या पैकी एक कु. बबिता बांधे (१४) व कु. तृषाली मडावी (१५) असलेल्या सांगितले जाते. एक मुलगी कॉम्पुटर क्लासला जाते असे सांगितले व दुसऱ्या मुलीने मैत्रिणी च्या घरी वाढदिवसाला जाते. असे म्हटले होते. घरुन बाहेर पडलेल्या या दोन्ही मुली रात्रि उशिरापर्यंत आप आपल्या घरी परतल्याच नाही. दोन्ही मुलींच्या पालकांनी त्यांचा शोधा शोध केले. परंतु त्यांना अपयश आले. या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी पालकांनी मुलींना पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून वरोरा पोलिसांनी तपास सुरू केला होता. या दरम्यानच्या वेळेत एका संशयितांचे मोबाईल लोकेशन वर्धा येथील आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वर्धेत मिळाळलेल्या लोकेशन नुसार तपास सुरू केला. परंतु मुलीचा शोध लागत नव्हता आणि तर एकीकडे तर दुसरीकडे नागरिक हैराण होवून नागरीकात मध्ये संताप व्यक्त होत होता. त्यामुळे तपासाची सुत्रे चंद्रपूर एलसीबीकडे देण्यात आले. चंद्रपूर एलसीबीने गांभीर्याने विचारात घेऊन तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवून आणि मिळालेल्या लोकेशन नुसार पुणेचा रस्ता धरला आणि या शोध मोहीमेला अखेर यश आले. पुणे येथील दोन्ही मुली मिळून आल्याचे सांगण्यात आले आहे. मुली सोबत असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते आज वरोऱ्यातील यांचे बयान घेतली जाईल अशी माहिती मिळाली आहे.
वरोऱ्यातील अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2021
Rating:
