सह्याद्री न्यूज | विलास पिसे
चिमूर, (२६ ऑक्टो.) : गत सहा-सात वर्षात वाढत्या महागाईमुळे सर्व कुटुंबाचे आर्थिक बजेट हे बिघडलेलेच आहे. एकीकडे या देशांत नोटबंदी आणि त्यानंतर महाभयानक कोरोना या महामारीत लोकांचे व्यवहार व कामधंदे डबघाईला आले. सर्वं वस्तूंचे रेट हे गगनाला भिडले, त्यामुळे घरच्या गृहिणीला आपले घर कसे चालवावे याची अधिक चिंता लागली आहे. खाद्यतेलाचे भाव प्रत्येक दिवसाला वाढत आहे, मग त्यात साखर सुद्धा आणि इतर वस्तूचे सुद्धा रेट हे वाढत आहे.
मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणांऱ्या लोकांना तारे वरची कसरत करावी लागत आहे. यात सामान्य माणसांस तुटपुंज्या कमाईत कुटूंब चालवावं लागत असुन मुलांबाळाचं शिक्षण कस बस तरी कराव लागत आहे एकीकडे चांगलं शेतात पीक आलं तर नैसर्गिक संकट ! दुसरीकडे शेत मालाला भाव मिळत नाही ! त्यामुळे आर्थिक बजेट बिघडते कारण शेतीचा खर्च वजा करता तुटपूंजी रक्कम हातात राहते. त्यामुळे घरच्या गृहिणींना घर चालविण्या साठी कसरत करावी लागते चिंतेंने सर्व सामान्य जनता हताश झाली आहे. प्रत्येक दिवसाला पेट्रोल डिझेलचे भाव हे आकाशाला भिडत आहेत गॅसचे भाव दर दिवशी नव्या रकमेचा उच्चांक गाठत आहे .त्यामुळे या येणाऱ्या दिवाळीमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करावे, कुटुंबाचा संसार कसा चालवावा, कारण येणारे दिवस हे दिवाळीचे आहे आणि या दिवाळीच्या पर्वात महागाईने अक्षरशा कळस गाठला आहे. गृहिणींचे आर्थिक बजेट हे कोलमडले आहे. नित्य महागाईने सर्व सामान्य जनता फारच वैतागली आहे.
दिवाळीच्या पर्वात वाढत्या महागाईने गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 26, 2021
Rating:
