केळापूर, (२५ ऑक्टो.) : पांढरकवडा ते वणी बस टाईमिंग सकाळा ९-१५ असुन या बसगाडीने वणी मारेगाव येथे कोर्ट, पंचायतसमिती, आश्रम शाळा, बांधकाम विभाग इतर विभागातील अनेक कर्मचारी व विद्यार्थी जात असतात. नियमित चालणारी बस व्यवस्था केवळ चालकाच्या नातेवाईकाच्या मृत्युमुळे बस टाईमिंगच रद्द करण्याचा तुगलकी प्रकार दि.२५/१०/२१ ला घडले. या बाबत चौकशी विभागाशी संपर्क केले असता उडवाउडविचे उत्तर देण्यात आले.
नियमित कार्यालयात जाणार्या कर्मचारी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद गांगुलवार यांनी केली आहे. असा प्रकार बंद करुन नियमित सेवा द्यावी अशी विनंती वरिष्ठाकडे केली आहे.
पांढरकवडा बस डेपोचा तुगलकी प्रकार: बसचालकाचे नातेवाईक मरण पावल्यामुळे बस टाईमिंग रद्द
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
