तालुक्यातील नदी नाल्याचा साठ्यावर रेती तस्करांच्या कडव्या नजरा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२६ ऑक्टो.) : महागांव तालुक्यात पंधरा ते वीस दिवस सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी व नाले तुडुंब भरुन गेले त्यात रेती माफियांने अवैध रेतीचा उपसा केलेल्या ठिकाणी आडमाप रेती साठा जमा झाला असून पाण्याचा सतचा प्रवाह चालु असल्याने रेती माफिया अडगळीस आलेले दिसुन येत आहेत तर पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या करीता नित्यनियम नदी नाल्याला हजेरी लावत आहेत. अवैध रेती वाहतुक होत असताना संबंधित प्रशासन दक्ष राहील काय? आणि या रेती माफियांवर कार्यवाई होईल काय? अशी जनमानसात चर्चा सुरु असुन रेती माफीयावर खरंच प्रतिबंध प्रशासन करेल का? 
रेती अभावी शहरात अनेक मोठमोठी बंधकामे रखडली असुन रेती माफियांना रेती साठी मागणी करीत आहे. नदी ला पाणी असल्याचे कारणे दाखवून चोरटी रेती वाहतूक बंद असल्याचे बांधकाम कर्त्यास कळविल्या जात असून, रेतीचे भाव गगनाला भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 
या विषयी संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची आज काळाची गरज निर्माण होत आहे.
तालुक्यातील नदी नाल्याचा साठ्यावर रेती तस्करांच्या कडव्या नजरा तालुक्यातील नदी नाल्याचा साठ्यावर रेती तस्करांच्या कडव्या नजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.