महसुल विभागाचा वरिष्ठ लिपीक विलास ठमके एसीबीच्या जाळ्यात


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२७ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागातील बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाके यांना याच वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्या नंतर काेरपना तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास ठमके यांस आपल्या सहका-याचे मदतीने आज मंगळवार दि.२६ ऑक्टाेबरला दुपारी अडीच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची घटना काेरपना तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली.

ठमके हे गेल्या सात वर्षापासून याच काेरपना तहसील कार्यालयाला लिपीक म्हणून काम करीत असुन त्यांनी भूमिधारी जमीन भुमिस्वामी करण्याचे जूण्या दस्तऐवजाची सत्यप्रत देण्यासाठी वनाेजा येथील एका शेतक-यांकडुन तब्बल अडीच हजार रुपयांची मागणी केली हाेती असे चाैकशी अंती कळले. त्यांना सेवानिवृत्ति हाेण्यांस अवघ्या नव महिण्यांचा कालावधी शिल्लक राहिला हाेता. इतकेच नाही तर त्यांचे बाबतीत जनतेच्या अनेक तक्रारी देखिल हाेत्या शेवटी आज ऐन दिवाळीच्या ताेंडावर खासगी व्यक्ती प्रदीप आदे यांचे मदतीने अडीच हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात ताे अलगद अडकला.या घटनेमुळे जिल्ह्यातील संपूर्ण महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पाेलिस अधीक्षक मिलिंद ताेतरे, पाेलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेत्रूत्वात ना.पाे.का.संतोष येलपुलवार,रवीन्द्र कुमार ढेंगळे, संदेश वाघमारे , वैभव गाडगे व सतिश शिडाम यांनी केली.
महसुल विभागाचा वरिष्ठ लिपीक विलास ठमके एसीबीच्या जाळ्यात महसुल विभागाचा वरिष्ठ लिपीक विलास ठमके एसीबीच्या जाळ्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on October 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.