सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२७ ऑक्टो.) : शेतमाल व शेतातील साहित्य चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या एक ते दोन महिन्यात चार पाच ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहे. आगष्ट महिन्यात नागपंचमीच्या रात्री आडकोला शिवारातील दिनेश देवाळकर यांच्या विहीरीतील पाणीपुडी मोटारपंप चोरट्यांनी लंपास केले. जवळपास त्याची किंमत २० हजारचे असून याबाबत तक्रार मुकुटबन ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानंतर पंधरा दिवसांनी पोळ्याच्या रात्री जामणी शिवारातील रोड लगतच्या शेतातून जवळ जवळ ५ हजार किंमतीचे ५ कोंबडे चोरीला गेले,या संदर्भात तक्रार दिली नाही. दि.११ आक्टोंबर च्या रात्री शेकापूर शिवारात नानाजी ठावरी यांच्या गट ५ या शेत आहे. दोन दिवस शेतात वाळवून काढून ठेवलेले सोयाबीन नंतर घरी नेण्याचा त्यांचा बेत होता. परंतु रात्री पिकअप वाहन शेतात घालून जवळपास २० क्विंटल सोयाबीन च्या वर चोरट्यांनी डल्ला मारला. बारा महिन्याची कमाई एका रात्रीतून
चोरून नेली.
या प्रकरणात चोरांची टोळी असल्याचे दिसून असून, यात चोरी च्या वाहनांचा वापर केला असल्याचे चर्चील्या जात आहे. या बाबाबत १२ आक्टोंबर मुकूटबन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे. परंतु दोन आठवडे लोटूनही पोलीसांना ते अज्ञान वाहन व संशयीत आरोपिंचा सुगावा लागलेला दिसत नाही.
शेतमाल शेती साहित्य चोरीच्या घटेनेपासून शेतकऱ्यांत असुरक्षितेचे वातावरण असून शेतातील शेडमध्ये कापुस, सोयाबीन या सारखा शेतमाल कोंबडे, जनावरे, शेती अवजारे, ओलीताचे उपयोगी शेत सामान या सारखे लाखो किंमतीचे सहित्य शेतात टाकलेले असतात ते नेण्याची धास्ती आहे.
शेकापूर येथील सोयाबीन चोरीच्या प्रकरणापासून शेतात वास्तव व रात्री जागली करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या टोळक्यापासून शेतातील मालमत्ते सह जिवितालाही धोका होण्याची भीती सर्व सर्वसामान्यांना वाटत असून, शेतमाल व शेतातील साहीत्यावर चोरट्यांच्या कडव्या नजरा असल्याने पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
शेतमाल व शेतातील साहीत्यावर चोरट्यांच्या कडव्या नजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 27, 2021
Rating:
