शिवापूर बंदर येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न


सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी
चिमूर, (२० ऑक्टो.) : आज दि.२०.१०.२०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील शिवापूर (बंदर) येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती पार पडली . जयंती निमित्त मार्गदर्शन करतांना या विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर म्हणाले की, राष्ट्र संत तुकडोजी महाराज व महापुरुषांचे विचार आताच्या पिढीला आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या शिक्षणा सोबत महापुरुषांचे विचार सुद्धा त्यांच्या अंगी यावे या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे असे त्यांनी मार्गदर्शनातुन सांगितले.

मंचावर ग्रा.पंचायत सरपंच मंजुषा नंन्नावरे, उपसरपंच आदित्य वासनिक, श्रीकृष्ण नन्नावरे, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद कामडी, मिथुन शोगलकार, चंद्रभान कामडी, रामदास कामडी, रामभाऊ कोडापे, मोतीरामजी कामडी, अमोल कामडी, प्रमोद कामडी, विलास कामडी, मनोहर कामडी, नंदाताई कोडापे, सुमित्राताई कामडी, लताताई कामडी, गिरजाताई कामडी, इंदूताई कामडी, तुरजाबाई कामडी, संगीताताई कामडी, मंगला कामडी, मंजुळा कामडी, नीताताई कामडी, दुर्गाताई कामडी, रजनी कामडी, निर्मला कामडी, लता मनोहर कामडी, उपस्थित होते.
शिवापूर बंदर येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न शिवापूर बंदर येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.