टॉप बातम्या

प्रदूषण राेखण्यांसाठी कच-याची विल्हेवाट लावा - यंग चांदा ब्रिगेडच्या नितू जैस्वाल यांची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२० ऑक्टो.) : विद्या टॉकीज परिसर वसाहत घुग्घुस प्रभाग सहा येथील नागरिकांतर्फे उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कच-यामुळे प्रदूषणात दिवसांगणिक वाढ हाेत असून, हे वाढते प्रदुषण रोखण्यांत यावे या प्रमुख मागणीसाठी घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्या नितुताई जैस्वाल यांनी आज दि.२० ऑक्टाेंबरला घुग्घूस नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना एक लेखी निवेदन सादर केले.

या परिसरात उघड्यावर टाकलेला हा कचरा साफ-सफाई करून नागरिकांना कचरा टाकण्यासाठी वेगळी कचरा कुंडी उपलब्ध करून द्यावी, अशी देखिल मागणी सादर केलेल्या निवेदनातून त्यांनी केली आहे.

निवेदन सादर करतांना सविताताई गोहने, कविताताई पाटील, नर्मदाताई खोब्रागडे, माधुरीताई करमनकर आदीं महिला उपस्थित होत्या.
Previous Post Next Post