टॉप बातम्या

अमरावतीत "आम्ही सिद्ध लेखिका" संस्थेच्या कार्यकारणीच्या पदग्रहण सोहळा संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेची अमरावती शाखा स्थापन करण्यात आली. सदरहु कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रा. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संस्थेच्या अध्यक्ष प्रा. प्रज्ञाताई हुशिंग उपाध्यक्ष प्रा. विजया मारोतकर यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या या संस्थेच्या सुपरिचित अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड ह्या मानद सचिव आहेत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये "आम्ही सिध्द लेखिका" ही संस्था गेल्या काही कालावधीपासून कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीची निर्मिती प्रा.विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.विजया कडू उपाध्यक्षपदी प्रा. विजया भांगे सचिव पदी शिल्पा ढोक कार्य अध्यक्षपदी रश्मी कुळकणी कोषाध्यक्षपदी वृषाली वानखेडे निमंत्रक म्हणून वसुंधरा खंबाईतकर संचालक म्हणून संजीवनी काळे, प्रतिभा देशमुख, शारदा मालपाणी, रेखा जाफरी, निलिमा भोजने, आधीच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. या वेळी स्वागत गीत शिल्पा ढोक यांनी सादर केले. प्रास्ताविक प्रा. विजया कडू यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विजया भांगे यांनी केले.
Previous Post Next Post