सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (३० सप्टें.) : तालुक्यातील राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य प्रशासना कडुन देण्यात आलेल्या नविन रुग्णवाहिकेचे अखेर लोकार्पन करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासुन ही रुग्णवाहिका राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सेवा न देताच उभी होती. अखेर ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पन सोहळा आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या अध्यक्षतेत पार पडला. आमदारांनी रिबिन कापुन या रुग्णवाहिकचे लोकार्पन केले. राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रुग्णवाहिका मिळावी म्हणून आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार व जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी विशेष प्रयत्न केले. या छोटेखानी सोहळ्यात प.स. सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंच विद्याताई पेरकावार, बिडियो गायणार, उपसरपंच बल्की, माजी सरपंच प्रणिता असलम, टिएचओ शेंडे, डॉ. राहुल चिखलकर, आरोग्य कर्मचारी तथा ग्रामवासी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात राजुर येथे सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतू या आरोग्य केंद्रात आद्यापही हव्या त्या सोई सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हे आरोग्य केंद्र नेहमी दुर्लक्षित राहिलं आहे. पालकमंत्र्यांनी दोन महिने आधिच या रुग्णवाहिकेचे लोकार्पन केले होते. पण आज अधिकृतरित्या लोकार्पन सोहळा घेऊन ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत देण्यात आली. चक्क दोन महिने ही रुग्णवाहिका नुसतीच रुग्णालयात उभी राहिली. रुग्णवाहिके अभावी रुग्णांना रेफर करतांना मात्र रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्णांचे मोठे हाल झाले. पण अखेर लोकार्पनाचा मुहूर्त सापडला व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली.
अखेर राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन रुग्णवाहिकेचे करण्यात आले लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
