टॉप बातम्या

दाेन दिवशीय बैठकीत चंद्रपूरातील ऑटो रिक्षाचालक मालक संघाचे पदाधिकारी उपस्थित

 

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, ( ३०सप्टे.) : महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक-मालक जिल्हा चंद्रपूर तर्फे मुंबई पनवेल येथील स्वाभिमानी रिक्षा मंच या ठिकाणी दोन दिवशीय परिषद घेण्यात आली. या बैठकीला २८ जिल्ह्याचे ऑटो युनियनचे पदाधिकारी व रिक्षा चालक माेठ्या संख्येने उपस्थित होते. या शिवाय सदरहु बैठकीला चंद्रपूरचे संस्थापक व अध्यक्ष राजू भाऊ खांडेकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, खुशाल साखरकर, सुधाकर बिसने, शंकर थोरात आदीं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. या बैठकीत पाच महत्वाचे विषय चर्चेला घेण्यात आले.

कल्याणकारी बाेर्ड स्थापन करणे, परमिट बंद करणे, विधान परिषद मध्ये ऑटाे चालकांना प्रतिनिधीत्व मिळणे असे झाले नाही तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ऑटाे चालकांना शहर व गाव पातळीवर स्टँड पार्किंग उपलब्ध करुन देण्याबाबत उपराेक्त बैठकीत चर्चा करण्यात आली.
Previous Post Next Post