टाटा ट्रस्ट व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्ताने पार पडले


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर प्रोग्राम व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे वतीने आज आयोजित थर्मल अब्लेशन ट्रेनिंग मध्ये 50 डॉक्टर्स आणि स्टाँफ नर्स सहभागी झाले होते.
प्रशिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
थर्मल अब्लेशन हे उपकरण गर्भाशयाच्या कॅन्सर साठी वापरले जाते. यावेळी डॉ.राठोड यांनी हे उपकरण उपलब्ध करून दिल्या बद्दल टाटा ट्रस्टला धन्यवाद दिले .

यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सारिका ठाकरे, डॉ. मनीषा घाटे, डॉ.रुजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन केले. सदरहु प्रशिक्षणास बेंगलोरचे श्री हिल्बर्ट जे प्रशिक्षक म्हणून आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनीषा घाटे यांनी कर्करोग होण्याची कारणे व जोखीम वाढवणारे घटक लहानपणापासून शारीरिक संबंध कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात गर्भ निरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन धूम्रपान, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, एच आयव्ही अथवा लैंगिक संबंधामुळे पसरणारे इतर रोग, ह्युमन पॅपिलोया विषाणू तसेच त्यावरील उपचार पद्धती डॉ. मनिषा घाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

उशिरा दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे हे प्रमुख कारण होय. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे, लघवी किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे सुद्धा उशिरा आढळतात. लवकर निदान होण्याकरिता सर्व महिलांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. हा कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. साधारणत: वयाच्या ११ ते १२ व्या वर्षांपासून ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्रा दिल्या जातात असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रूजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाटा ट्रस्टचे सुरज साळुंके यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार डॉ.आशिष बारब्दे यांनी मानले.
टाटा ट्रस्ट व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्ताने पार पडले टाटा ट्रस्ट व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्ताने पार पडले Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.