शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० सप्टें.) : तालुक्यातील कृष्णापुर येथील अल्पभुधाक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळुन टेकडीवर जाऊन टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्जुन रामचंद्र आडे (४३) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ढाणकी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी अर्जुन आडे यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर विविध सहकारी सोसायटी ढाणकी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. 
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.