ग्रामसभा घेण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे ग्रा पं ला निवेदन

सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३० सप्टें.) : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व वाढलेल्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले होते, परिणामी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून ग्रामसभा घेण्यास आळा बसला होता. परंतु आता संक्रमण कमी झाल्यामुळे शासनाने लॉकडाऊन हटविले आहे.सध्या ग्रामसभा घेण्यास काहीच अडचण नसल्याने जनतेच्या समस्या, तक्रारी व मागण्या ग्रामसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामसभा घेण्यात यावी, यासाठी येथील राजूर विकास संघर्ष समितीचे वतीने राजूर ग्रा पं च्या सरपंच यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून किमान ४ ग्रामसभा होणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा घेण्यात आली पाहिजे होती. परंतु ती घेण्यात आली नाही. ग्रामसभा ही लोकशाही प्रक्रियेची उच्चतम प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये लोक म्हणजेच जनता ही सर्वतोपरी असते. जनतेला काय हवे, काय नको, त्याच्या समस्या काय आहेत?, त्यांच्या मागण्या काय आहेत? हे ग्रामसभेत ऐकून त्याचे निराकरण करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य असते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आपले म्हणने मांडणे हे जनतेचे अधिकार असते. त्यामुळे ग्रामसभा न होणे किंवा न घेणे हे जनतेच्या अधिकाराचे हनन आहे, त्यांना आपल्या अधिकारापासून वंचित करणे आहे.

गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसभा न झाल्याने गावातील अनेक समस्या व मागण्या जनतेला मांडत्याच आल्या नाहीत, त्यामुळे येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीला ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके यांनी ग्रा पं ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रामसभा घेण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे ग्रा पं ला निवेदन ग्रामसभा घेण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे ग्रा पं ला निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.