सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (३० सप्टें.) : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला भुलथापा देत घरी बोलाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापीत करुन तिला गर्भवती करू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या वासनांध तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौरकर ले-आउट येथे निवासस्थान असलेल्या व काही वर्षांपासून गुरुनगर येथे किरायाणे रहात असलेल्या विक्की किशोर पटुणा (20) याने एका अल्पवयीन मुलीशी आधी मैत्री व नंतर प्रेम संबंध निर्माण केले. तिला आमिशे प्रलोभने देत आपल्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन मुलगी शहरातच असलेल्या एका समारंभात आपल्या परिवारासह आली होती. या तरुणाने समारंभातच तिच्याशी ओळख निर्माण करित जवळीक साधत तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिला प्रेमाची ओढ निर्माण झाल्यानंतर त्याने तिला भुलथापा देऊन आपल्या घरी बोलावले. ती घरी येताच त्याने तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हे सत्य उघडकीस आले. मुलीच्या आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन या बाबत विचारले असता तीने विक्की पटुणा याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन भुलथापा देत आपल्या घरी बोलावुन जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याचे सांगितले. मुलीच्या आई वडिलांना हे ऐकुन चांगलाच धक्का बसला. त्यांनी मुलीला घेऊन तत्काळ पोलिस स्टेशन गाठले, व आरोपी विरुध्द लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आरोपीला अटक करित त्याच्यावर भादवि च्या कलम 376 (3) व बालकांचे लैगिक अत्याचारा पासुन संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम 4, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटाक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
प्रेमात पडलेल्या अल्पवयीन तरुणीला घरी बोलावून केला लैंगिक अत्याचार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
