महागाव तालुक्यातील शौर्यांचा किसान सभेनी केला गौरव



सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के    
महागांव, (०१आक्टो.) : दिनांक ३०/९/२०२१ रोजी किसान सभेनी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या तिन भुमीपुत्राचा एकाच मंचावर गौरव करुन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले, बाजार समिती च्या प्रांगणात हे शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी चळवळीत काम करणारे किसान सभेचे नेते अॅड, कॉ. डी.बी. नाईक होते. सर्व प्रथम वाकान येथील अविनाश सवाई राठोड यांचा डी.बी.नाईक मा.सभापती पं.स.महागाव यांचे हस्ते गौरव शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन करण्यात आले यावेळी गौरव मुर्ती अविनाश यांनी मनोगत व्यक्त करताना जीवाचीपर्वा न करता, दहागाव येथील एस. टी. अपघातात (पुरात ) वाहुन जात असलेल्या प्रवाशांचे प्राण वाचविले. या धाडसी युवकाने मदत करत असताना जात, धर्म, न पाहता केवळ मानव समाज या एकाच उद्देशाने मी हे काम केले, असे उद्गगार काढताच उपस्थितीतांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
सेवा नगर येथील गरिब कुटुंबातील कबड्डीपटू सुवर्ण पदक विजेता राजकुमार भिकु जाधव या दुसऱ्या नवयुवकांचा कॉ. देवीदास मोहकर मा.जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आले. यावेळी राजकुमार यांनी आपल्या आर्थिक कठीण परिस्थिती मध्ये उमरखेड ते रोहतक हरियाणा राष्ट्रीय स्तरापर्यंत (वयोगट २२ वर्ष) ऑलराउंडर खेळाडू चा प्रवास व महाराष्ट्र चमुचे नेत्रुत्व करुन गोल्ड मेडल प्राप्त करून राज्याला सन्मान मिळवून दिले पुढे बोलताना भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याची मनिषा जाहीर करतात उपस्थिताचे स्वाभिमानाने उर भरुन आले.
शेवटी वयोगट केवळ १७ कबड्डीपटू बेलदरी येथील अमण संदीप आडे यांचा श्री मोहन पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आले. बेलदरी येथील पाटील घराण्यातील चमकता तारा यानेही रोहतक हरियाणा येथील राष्ट्रीय स्तरावर प्रविण जाधव कबड्डीपटू यांचे योग्य मार्गदर्शनात राज्य चमुचे कप्तानी करून रौप्यपदक मिळविले व भविष्यात देशपातळीवर नेत्रुत्व करण्याचे चिमुकल्या अमनने मनोगत व्यक्त करताच या वाक्याने सर्वांना एक वेगळीच उर्जा मिळाली.

यानंतर प्रा, शरदचंद्र डोगरे सरांनी बोलताना सत्कार्याचाच सत्कार होतो,धन व संपतीधारकांचा नाही, यापुढे आम्ही सर्व जन अविनाश, राजकुमार, अमन यांच्या अडचणी त आवाज द्या, सदैव तत्पर राहून मदत करु असे म्हटले. सोबतच कॉ. देवीदास मोहकर यांनी या तिन्ही नवतरुणाचा शौर्यवान व तालुक्याची शान जाहीर करुन तुम्ही तालुक्यातील नवतरुणाचे आदर्श व्हा आम्ही सर्वतोपरी मदत करु असे अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. बी. नाईक यांनी  शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या महागाव च्या मातीची ताकद उंच शिखरावर ज्या वीरांनी नेली त्यांचे कौतुक शेतकरी सभेने करायला पाहिजे या साठीच हे जिवाळ्याचे आयोजन केल्याचे सांगुन अविनाश नी मदत करतांना त्यांचा मानवी दृष्टीकोन हा मनावर कोरलं गेल आणि आता अविनाशला (गव्हर्नमेंट डिझायर) विषेश बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून  घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मार्फत प्रयत्नास मदत करु असा विश्वास दिला, पुढे नाईक बोलताना म्हणाले की, राजकुमार यांनी सुध्दा प्रतिकुल परिस्थिती वर जिद्दीने मात करता येत, हे जीवनाचा मूलमंत्र दिला आहे. परिस्थीती कीतीही बिकट असो जगायचं तर नावाप्रमाणे राजकुमार सारखंच हा निर्धार या तरुणांने केल्यामुळे याची प्रेरणा ग्रामीण भागातील अनेक तरुणाना मिळत आहे. छोट्याशा अमनने तर बालपणातच नेत्रुत्व करुन भविष्याची उज्वल झलक दाखविल्या मुळे तालुक्याचा लिटल मास्टर झाला आहे. एकंदरीत अविनाश, राजकुमार, आणि अमन हे महागाव तालुक्याचे आन, बान, आणि शान ठरले आहे आणि महागाव च्या मातीचा पराक्रम देश पातळीवर गाजवला आहे. म्हणून या तिन्ही विक्रमवीरांनी कोणत्याही प्रशासकीय अडचणीत किसान सभेला हाक द्यावी, आम्ही ओ म्हणून हजर राहु असेही शेवटी डी.बी. नाईक यांनी या तिन्ही गौरव मुर्तीचे मनोबल वाढविले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, उमरखेडचे श्री.देवहरी पवार, नि. बॅक अ.प्रा. शरदचंद्र डोगरे,सामाजिक कार्यकर्ते, श्री मोहन पांडे मा, उपसरपंच भांब, कॉ.नाना पानपट्टे, कॉ.गणेश तिघलवाड, कॉ. विनोद आडे, कॉ. प्रकाश ढगे, कॉ. बाळासाहेब रणमल्ले, कॉ. कैलास राठोड, बाळु राठोड, अंकुश आडे, सह अनेक जन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपकराव देशमुख ता. अध्यक्ष किसान सभा यांनी केले आणि कॉ. नानाभाऊ पानपट्टे यांनी मानले.
महागाव तालुक्यातील शौर्यांचा किसान सभेनी केला गौरव महागाव तालुक्यातील शौर्यांचा किसान सभेनी केला गौरव Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.