सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधिनस्थ महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांनी मान्यता दिलेल्या 23 केंद्रामध्ये 10/20 च्या कोट्यात जनरल नर्सिंग व मिडवायफरी (जीएनएम) प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आरोग्यसेवा आयुक्तालय महाराष्ट्र मार्फत सुरू आहे.
आम आदमी पार्टीचे महानगर सचिव राजु कुडे यांचेकडे तक्रार प्राप्त झाली की, या विभागाकडून ॲडमिशनच्या नावाखाली लूट सुरू आहे व काही दलाल सक्रीय झाले आहे. उपराेक्त तक्रारी संदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे व युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी संबंधित प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता, येथील प्राचार्या कडून अधिसुचनेचे पालन करीत नसल्याचे लक्षात आले. व स्वतःच्या मर्जीने नियम धाब्यावर बसवून काम करीत असल्याचे दिसून आले.
नियम पुस्तिकेत नियम 8 अनुसार ज्यांची निवड झाली त्यांचे कडूनच फक्त मेडिकल फीटनेस सर्टिफिकेट व ईतर कागदपञे घेण्यांत यावे हे स्पष्ट लिहीले आहे. परंतु फक्त 23 केंद्रा साठी फार्म घेणांऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मेडिकल फीटनेस सर्टिफिकेटची अवाजवी मागणी करणे चुकीचे आहे. ही बाब गहलोत उपसंचालक मुंबई यांचे निदर्शनास लगेच आम आदमी पार्टीने आणून दिली त्यांनी तात्काळ आदेश देऊन मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचा आदेश दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांची मेडिकलच्या नावाखाली होत असलेली पाचशे रुपयांची लूट व त्याकरीता मेडीकल ऑफीसर कडे वारंवार माराव्या लागणाऱ्यां चकरा आम आदमी पार्टीने तात्काळ थांबवल्या आहे. एकीकडे महाभयानक कोरोनाचा काळ सुरू आहेत, कामधंदे ठप्प पडले आहे. त्यातच पाचशे रुपये फार्मचे व मेडिकलचे पाचशे रुपये त्यानंतर बाहेर गावातील विद्यार्थ्यांना लागलेला तिकीटचा खर्च यामुळे ही बाब विद्यार्थ्यांना न झेपणारी होती. प्रत्येक विद्यार्थ्यांची पाचशे रुपयाची होणारी लूट थांबविल्याबद्दल सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आम आदमी पार्टीचे आभार मानले आहे.
विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यात जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार, महानगर सचिव राजू कुडे, आप पदाधिकारी महेश गुप्ता, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, निखिल बारसागडे तसेच आम आदमी पार्टीच्या इत्तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
विद्यार्थ्यांची लूट आम आदमी पार्टीने थांबवली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
