सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (९ ऑक्टो.) : शहरातील गोपाळ कृष्ण मंदिर येथे भिशन अपघात झाले असून यात सुदैवाने कोणतेही जिविता हानी झाली नाही.पांढरकवडा येथे माल खाली करून बोरी येथे परतिला निघालेल्या आयचर गाडी क्रमांक AP01 T4898 या गाडीतील मद्यधुंद चालकाने गोपाळकृष्ण मंदिर येथे उभ्या असलेल्या , ऑटो MH26T8831, मेस्ट्रो MH29BN1077, सेंट्रो एस्ट्रा कंपनी कार MH29BC8170 या उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन शहरातील पथदिवाच्या खाब्याला जबरन धडक दिली यात सुदैवाने कोणतेही जिविता हानी झाली नाही. मद्यधुंद चालक अजीम खान गफुर खान वय ३८ व ऑटो चालक सह विकी बोरकर,राशिद गोरी,प्रमोद कनकमवार,ऐकुन ४ व्येक्ती रा. पांढरकवडा किरकोळ जखमी झाले पुढील उपचारासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहरात जड वाहनांचे प्रमाण वाढले आहे. केळापूर येथील टोल नाका वाचविण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदाई वाढली असून शहरात मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कडे पांढरकवडा वाहतूक उपशाखा लक्ष केंद्रित करून कारवाया करण्यात यावे अशी मागणी आम नागरिकांकडून होत आहे.या अपघाताच पुढील तपास पांढरकवडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी करत आहे.
मधधुंद चालकाने कार, ऑटो, टू व्हीलर, वाहनांना चिरडले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
