डॉक्टरांच्या गैरहजरीमूळे तरुणाचा मृत्यू: नेरी येथील घटना


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१४ ऑक्टो.) : चिमूर तालुक्याच्या नेरी येथील मूळ रहिवाशी असलेल्या संजय शिवा गराटे नावाच्या 35 वर्षिय तरुणाला आज सकाळी 7 वाजता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गराटे यांच्या नातेवाईक व मित्र मंडळीनी केला आहे. या रुग्णालयातील संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी रेटून धरली हाेती. उपरोक्त घटनेमुळे काही वेळा साठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेरी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गभणे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले .दरम्यान मृतकाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रवाना करण्यांत आले आहे.
सदरहु प्रकरणाची सतीश वारजूकर यांनी दखल घेत त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना या बाबतीत तक्रार केली हाेती.

इतकेच नाही तर सतीश वारजुकर यांनी आरोग्य प्रशासन ला जबाबदार धरत त्या डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी देखिल या वेळी केली हाेती .दरम्यान रुग्णालयातील त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आल्याचे विश्वासनिय व्रूत्त आहे .

उपराेक्त प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मंगर हे अनुउपस्थित राहत असल्याची नेरी येथील जनतेची ओरड आहे.
डॉक्टरांच्या गैरहजरीमूळे तरुणाचा मृत्यू: नेरी येथील घटना डॉक्टरांच्या गैरहजरीमूळे तरुणाचा मृत्यू: नेरी येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.