आदिवासी बांधवाची निघाली चंद्रपूरात महाप्रतापी, विव्दान पंडीत महाराजा रावण यांच्या सन्मानार्थ लक्षवेधक रॅली
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१४ ऑक्टाें.) : आज स्थानिक जेल परिसरातील क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे स्मारकांजवळुन दुपारी ३ वाजता आदिवासी बांधवा तर्फे महाप्रतापी, विव्दान पंडीत राजा रावण यांच्या सन्मानार्थ भव्य रॅली काढण्यांत आली. रावण दहन प्रथा बंद करा ही प्रमुख मागणी रॅलीतील आदिवासी बांधवाची हाेती. सदरहु ही रॅली जाेरदार घोषणा देत गांधी चाैक मार्गे जटपुरा गेट पर्यंत पाेहचली त्या नंतर ती रॅली परत आझाद बाग, गिरणार चाैक मार्गे शहीद बाबुराव स्मारका जवळ दुपारी ४:३० वाजता पाेहचली.
आजच्या या रॅलीचे नेतृत्व जागरचे अशाेक तुमराम यांनी केले. रॅलीत भूषण फुसे, जितेश कुळमेथे, नरेन्द्र गेडाम वामन गणविर, पुरुषोत्तम साेयाम, राजू किन्नाके, रवि मसराम, संदीप सुखदेवे, साेमेश राजगडकर, शुभम मडावी, दिवाकर मेश्राम, जाेगी नैताम, महिपाल मडावी, माराेती जुमनाके, विलास मसराम, प्रताप मडावी, बंडु जुमनाके, एकनाथ कन्नाके, गाेकुल मेश्राम, संतोष सलाम, बाबूराव जुमनाके, नरेश आत्राम, रणजित गेडाम, प्रतीक उईके, अमाेल मेश्राम, बंडु पेंदाम, अभिलाष परचाके, दिलीप कन्नाके, शाम गेडाम, गाेलू गेडाम, दिलीप मडावी, युवराज मेश्राम, चरणदास भगत, मनाेहर मेश्राम, नितेश बाेरकुटे, साईराम मडावी, गजेन्द्र कुळमेथे, प्रदीप गेडाम, मधुकर मडावी, रमेश पाेरेते प्रवीण मडचापे, नारायण पेंदाेर, गणेश गेडाम , विनाेद शेडमाके, कपूर आत्राम, नरेश आत्राम, बाळु कुळमेथे, कटु काेटनाके, विठ्ठल कुमरे, रमेश मेश्राम सतीश साेनटक्के, जमुना तुमराम , रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, वंदना मेश्राम , अनिता राजगडकर, लता परोते, अनुसया चांदेकर, साेनु चांदेकर, तारा आत्राम, संगिता येरमे, सुलभा पेंदाम, कुंदा उईके, निता साेयाम, अंजना मडावी, राधाबाई शिडाम, प्रिती मडावी, शशीकला उईके आदीं सहभागी झाले हाेते. विशेष म्हणजे रैलीतील सजलेल्या रथाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले हाेते . या रैली दरम्यान प्रशासनाच्या वतीने पाेलिसांचा कडेकाेट बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता.
आदिवासी बांधवाची निघाली चंद्रपूरात महाप्रतापी, विव्दान पंडीत महाराजा रावण यांच्या सन्मानार्थ लक्षवेधक रॅली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2021
Rating:
