शेकापूर शिवारातील घटना : शेतात काढून ठेवलेलं २० कि.सोयाबीन नेले चोरून


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
झरी, (१३ ऑक्टो) : शेकापूर येथील शेतकरी नानाजी ठावरी यांचे काढणी करून वाळण्यासाठी  शेतात ठेवलेले सोयाबिन चारी गेल्याची घटना आज दि. १२ ऑक्टोंबर मंगळवार ला सकाळी उघडकीस आले.  
सविस्तर असे की, नानाजी ठावरी रा. शेकापूर यांचे रोडलगत शेत सर्वे गट ५ चे शेत आहे. हे शेत मुच्ची साईडला शेत असून जंगल लागलेले आहे. यात तीन एकर सोयाबिन लावले होते . कापणी करून गंजी केल्यानंतर रविवार ला ट्रॅक्टर थ्रेशरने सोयाबिन ची काढणी करण्यात आली. काढलेल्या दाण्यात ओलावा असल्याने योगायोगाने वातावरण स्वच्छ असल्याने दोन-तीन दिवस सुकण्या करीता निर्णय घेतला. जंगल जवळ असून वाघाच्या दहशतीने उघड्यावर जागल करणे अशक्य असल्याने संध्याकाळी पुन्हा गोळा करून टाळपत्री झाकून रात्री एखादी शेतावर चक्कर टाकत असतांना मंगळवारला सकाळी शेतात सोयाबीन पसरवून वाळू घालण्याकरता गेले असता, टाळपत्री खाली सोयाबीनचा ढिग दिसून आला नसल्याने शेतकर्‍याला धक्का बसला. ढिगा पासून शेतात चारचाकी वाहनाची चाकोरी दिसून आल्याने  सोमवार च्या रात्री मालवाहू वाहनातून चोरट्यानी  सोयाबीन नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यामुळे अंदाजे २० क्विटल सोयाबीन आजच्या दराने जवळपास १ लाख २० हजार रु. याचे नुकसान आहे. या संदर्भात मुकूटबन पोलीस ठाण्यास तक्रार देण्यात आली आहे. 


शेकापूर शिवारातील घटना : शेतात काढून ठेवलेलं २० कि.सोयाबीन नेले चोरून शेकापूर शिवारातील घटना : शेतात काढून ठेवलेलं  २० कि.सोयाबीन नेले चोरून  Reviewed by सह्याद्री चौफेर on October 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.