सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (१३ ऑक्टो.) : स्थानिक विश्राम भवन कळंब येथे जिल्हाध्यक्ष मा.आनंद भगत यांचे अध्यक्षते खाली व जेष्ठ नेते नामदेव थुल, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार आत्राम, अति.सरचिटणीस विक्रांत खरतडे यांचे प्रमुख उपस्थितीत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तालुका शाखा कळंब चे तालुका अध्यक्ष पदी मा.संदिप इंगोले तहसील कार्यालय कळंब यांची नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.
तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त केले.
संदिप इंगोले यांच्या माध्यमातुन कर्मचारी बांधवांचे समस्याचे निश्चित निवारण होईल अशी अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
संघटनेच्या माध्यमातुन कर्मचारी बांधवांचे समस्याचे निवारण करण्या करीता मी प्रामाणिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संदिप इंगोले यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांच्या कडे व्यक्त केली.
या सभेला कळंब तालुक्यातील संघटनेचे विविध विभागाचे बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल संदिप इंगोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कळंब तालुका अध्यक्ष पदी संदिप इंगोले यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2021
Rating:
