विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पं. स. झरी अंतर्गत केंद्रस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२३ ऑक्टो.) : पंचायत समिती, झरी-जामणी येथे नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्या संकल्पनेतून पं. स. अंतर्गत एकूण दहा केंद्रातील ११६ शाळेमधील जि.प. शाळेमधील शालेय विद्यार्थ्याकरीता केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

मागील सत्रात कोरोना महामारीमुळे प्रदीर्घ  कालावधीनंतर प्रत्यक्षात वर्गाध्यापनाला सुरूवात झाली आहे. शाळांमध्ये पुन्हा नव्या जोमाने किलबिलाट सुरू झाली. हाच मुद्दा हेरून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, विद्यार्थी वक्तृत्वामध्ये व्हावा, त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यायला पाहिजे, भाषिक कौशल्य विकसित झाले पाहिजे या हेतूने कोरोना कालावधीतील विद्यार्थ्याचे मनोगत व्यक्त करण्याकरीता केंद्र स्तरावर इयत्ता १ ते ५ व ६ ते ८ या दोन गटामध्ये कोरोना महामारीचे मानवी जीवनावर झालेले परिणाम. या विषयांवर वक्तृत्त्व स्पधेचे आयोजन करून विद्यार्थ्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
केंद्रस्तरीय वक्तृत्त्व स्पर्येमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रत्येक गटातील स्पर्धकाला प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुंडकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. केंद्रस्तरावरून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा नियोजीत असल्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उपक्रम यशस्वी करण्या करिता गटशिक्षण अधिकारी प्रकाश नगराळे नेतृत्वात केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापण समिती व पालकांचा ही मोठ्याप्रमाणात सहभाग दिसून आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पं. स. झरी अंतर्गत केंद्रस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पं. स. झरी अंतर्गत केंद्रस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.