सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२३ ऑक्टो.) : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती यवतमाळ जिल्हा बैठक दौऱ्यामधील आदरणीय सन्मानीय नामदार मा.आमदार श्री.राजकुमार पटेल साहेब यांना झरी (जामणी) आदिवासी बहुल तालुक्यातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भीमराव सिडाम, लालशाव तुमराम, जंगा मडावी, गोविंद्ररावजी किनाके, संभुदेव मडावी, बाबूलाला गेडाम, सुभाष पेंदोर, व पत्रकार योगेश मडावी यांनी तालुक्यातील समस्या मांडून निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय माथार्जुन यांनी ग्रामपंचायतची जागा न निवडता गोंड पंच कमेटीच्या जागेवर राजीव गांधी सेवा केंद्र उभारण्यात आले. असून, एक प्रकारचा आमच्या समाजावर वर अन्याया करण्यात आला. वर्षे 2013 मध्ये या इमारतीचे बांधकामाचे ठराव ग्रामपंचायत पदधिकारी श्री. संतोष रामरेड्डी जंगीलवार यांच्या कार्यकाळात पारित करण्यात आले. या बांधकामाचे गोंड पंच कमेटीचे दान पत्र असून, खोटे दस्ताऐवज सादर करून सदर इमारत उभारण्यात आली. असा आरोप ही यावेळी करण्यात आला.
आदिवासी समाजाची फसवणूक करण्यात आली असून अत्याचार प्रतिबंध व शासनाची दिशाभूल कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावे व राजीव गांधी भवन इमारतीची दुपटीने वसुली करून गोंड पंच कमेटी सभा गृह उभारण्यात येऊन गोंड पंच कमेटी च्या ताब्यात जागा देण्यात यावी. असे निवेदनातून मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर गोंड पंच कमिटीने मांडल्या तालुक्यातील समस्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2021
Rating:
