सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा येथील मूळ रहिवाशी तथा महाराष्ट्रातील सुपरिचित पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी महसूल विभागातून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यांचा निर्णय आज शनिवारला संध्याकाळी या प्रतिनिधी साेबत चर्चा करतांना बाेलून दाखविला. दरम्यान त्यांचे सेवेला तब्बल नव वर्षे शिल्लक आहे. शासकीय नाेकरीत असतांना त्यांनी अनेक अवैध प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. हे येथे उल्लेखनिय आहे.
दाेन तिन दिवसांपुर्वीच त्यांनी एका प्रकरणात वराे-याच्या महिला तहसीलदार राेशन मकवाने यांचे विरुध्द पाेलिस स्टेशनला तक्रार दाखल केली हाेती. सेवानिवृत्ती नंतर त्यांचा राजकारणात येण्यांचा मानस आहे.
वराेऱ्यातील नामवंत पटवारी विनाेद खाेब्रागडे यांचा सेवानिवृत्ती घेण्यांचा विचार !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2021
Rating:
