सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (२३ ऑक्टो.) : तालुक्यातील चिल्ली व सुकळी (ज) गावादरम्यान तुळजापूर नागपूर महामार्गावर अज्ञातांनी ट्रक चालकाची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असुन, महामार्गावर घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यात आलेला ट्रक चालक हा बिहार राज्यातील औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्याचे नाव अमर कुमार (वय २५) असल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन, आज सकाळी ६ वाजता सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुर्यावर एक मृतदेह असल्याची माहीती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृतकाची ओळख हायवेवरुन जात असलेले दुसरे ट्रक चालक वेदराम ठाकूर रा.भिलाई छत्तीसगड यांनी पोलिसांना दिली तसेच मृतका सोबत रात्री ८ वाजता फोनवर संभाषण झाल्याचे सुद्धा वेदराम ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले. मृतक अमरकुमार ट्रक चालक हे ट्रक घेऊन बिलासपुर छत्तीसगढ ते परळी ला ट्रक क्रमांक CG 07 A X 3772 दगडी कोळसा घेऊन जात होते. सदर घटना रात्री १ ते ४ च्या दरम्यान घडली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृतकाचे हत्या झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. तपास करण्यासाठी यवतमाळ येथून फॉरेन्सिक लॅब तज्ञ व डॉग स्कॉट बोलावण्यात आलेले आहे. हत्या चे कारण अद्यापही समोर आले नाही व मारेकरी अजूनही कोण आहेत हे सुद्धा समोर आले नाहीत.
सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल माळवे, पीएसआय विनीत घाटोळ, ए.पी.आय. संदीप गाडे करत आहे. मृतक शरीर शवविच्छेदनासाठी उमरखेड शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.
"या" महामार्गावर अज्ञाताकडून ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2021
Rating:
