त्यांनी समाजातून "यांना" बहिष्कृत केले : वरिष्ठांकडे तक्रार दाखल, अद्याप त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड तालुक्यातील माैजा पळसगांव खुर्द येथील एका सर्व सामान्य कुटुंबातील चार व्यक्तिंना क्षुल्लक कारणास्तव बहिष्कृत केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असुन, अद्यापही हे कुटुंब आपणांस न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहे. परंतु हे वृत्त लिहीपर्यंत त्यांना याेग्य न्याय मिळाला नाही.

सध्या हे कुटुंब समाजातुन बहिष्कृत आहे. या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की, पळसगांव खुर्द येथील मुळ रहिवाशी देवानंद मानिक सुखदेवे हा बाैध्द समाजाचा अध्यक्ष आहे तर मनिष वसंतराव शेंडे हा पळसगांव (खुर्द) येथील बाैध्द समाजाचा सचिव आहे. अनुक्रमे केवळ नारायण बारसागडे, दिनेश नारायण साेनटक्के, किशाेर हेमचंद रामटेके हे या समाजाचे क्रियाशील सदस्य आहे. या शिवाय प्रिया दिनेश साेनटक्के, छाया भिमराव साेनटक्के, बेबीनंदा धर्मदास गणविर, डिंपल क्रूष्णा शेंडे, श्रीदेवी मनिष शेंडे व दिपीका दीपक मेश्राम या समाजात गेल्या काही दिवसांपासून सदस्या म्हणुन काम बघत आहे. दि. १५ जानेवारी २०२१ ला पळसगांव (खुर्द) या ग्राम पंचायतची निवडणूक हाेती. त्यात याच गावातील मिलिंद शिवाजी मेश्राम,यांनी आपल्या मर्जीने हेमलता रामटेके व चंद्रदीप माेहुर्ले या उमेदवाराचा निवडणूकीत प्रचार केला. परंतु त्यांना ही निवडणूक जिंकता आली नाही. एव्हढेच नाहीतर त्यांना या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला. या नंतर गैर अर्जदार एक ते पाच यांनी मिलिंद मेश्राम यांनी प्रिया साेनटक्के व प्रिया रामटेके यांचे विरुध्द निवडणूक प्रचार केला म्हणून त्यांना व त्यांचे कुटुंबातील एकून तीन सदस्यांना चक्क! दि.१\२\२०२१ ला समाजाची सभा बाेलावून समाजातुन त्यांना बहिष्कृत करण्याचा ठराव (बाैध्द समाजाने) घेतला. दुस-या दिवशी ही बाब मिलिंद मेश्राम यांना माहित झाली. मेश्राम यांची पत्नी दि.२\२\२०२१ला सकाळी ८ वाजता दुध आणण्यांस अशाेक मेश्राम यांचे घरी गेली असता तिला दुध देण्यांस त्यांनी चक्क नकार दिला. त्याच दिवशी सायंकाळी बबिता प्रवीण रामटेके यांचे निवास स्थानी बचत गटाची मिटींग हाेती. छबूबाई मेश्राम ह्या मिटींगला गेल्या असता त्यांनी तिला प्रवेश नाकारला.

हतबल झालेल्या या परिवाराने नागभिड पाेलिस स्टेशनसह इत्तर वरिष्ठ अधिका-यांकडे या बाबतीत लेखी तक्रारी सादर केल्या आहे. परंतु अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. आज ही त्यांचेवर बहिष्कार कायम आहे. विशेष म्हणजे छबूबाई मेश्राम या आशा वर्कर असुन त्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या एक जेष्ठ सदस्या आहे.
त्यांनी समाजातून "यांना" बहिष्कृत केले : वरिष्ठांकडे तक्रार दाखल, अद्याप त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही ! त्यांनी समाजातून "यांना" बहिष्कृत केले :  वरिष्ठांकडे तक्रार दाखल, अद्याप त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.