वरोरा तालुक्यातील बोरी नदीपात्रातील कारवाही, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सर्वात मोठी कार्यवाही


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२३ ऑक्टो.) : वरोरा तालुक्यात मोजके रेती घाट लिलाव झाले असून,काही घाट लिलाव झाले नाही.त्यामुळे जे घाट लिलाव झाले नाही त्या ठिकाणावरून रेतीतस्कर कोणताही परवाना नसतांना रेती तस्करी करीत आहे. रेतीतस्कर बोरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीतस्करी करीत असल्याची गुप्त माहिती खबरीवरून पोलीस विभागाला मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि पोलीस चमुनी बोरी नदीपात्र गाठले. त्याठिकाणी पोकळ्यांड व बोरचे मदतीने रेती उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावर ट्रक क्र. एम एच 34 एबी 2960 ,एम एच 32 वि यु 6451,ट्रक क्र.एम एच 40 बिजी 5080,ट्रक क्र.एम एच 35 के 2724 हे वाहने रेती भरून दिसून आले.
योगेश रामटेके,नाना चांभारे, दिशान कुरेशी रा.वरोरा व इतर एक अशा चार आरोपींवर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही 18 ऑक्टोम्बर ला रात्रौ दरम्यान करण्यात आली. कोणताही परवाना नसतांना संगनमत करून बोरी नदीचे पात्रातून अवैद्यरित्या रेती चोरी करीत असता मिळून आले असून रेतीसह एकूण 52 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचेवर कलम 379, 34 भांदवी गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

नव्याने रुजू झालेल्या एस डी पी ओ (आय पी एस) आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात मोठी कार्यवाही अवैद्य धंद्याना आळा घालणे हे माझे पहिले कर्तव्य असे सांगणारे एसडीपीओ यांनी अवैद्य धंद्यामध्ये वर्षानुवर्षे गुंतून असलेल्या मोठ्या माशांना आपल्या जाळ्यात लटकविण्याची धडाडी सुरू केली आहे. कर्तव्यदक्ष व दमदार अशा पोलीस अधिकाऱ्याकडून रेतीतस्कर अथवा सट्टा व्यावसायिकांच्या मुसक्या नक्कीच आवळल्या जाणार आणि अवैद्य धंद्याना निश्चितच आळा बसणार अशा आशा पल्लवित झाल्या आहे अशी जनतेत चर्चा दिसून येत आहे.

महसूल विभागाचे कर्तव्य पोलीस विभाग निभावतात तेव्हा----

कोणताही परवाना नसतांना रेती तस्कर रेतीचे मोठमोठे साठे करून चढत्या भावाने रेती विकतात.तसेच पोकलंड व बोरचे सहाय्याने रेती उत्खनन आणि लाखोंचा महसूल डुबत असतांना सुद्धा महसूल विभागाचे दुर्लक्ष का?असा प्रश्न उपस्थित होत असून हा संशोधनाचा विषय आहे.रेती तस्करांवर कार्यवाही करण्याचे प्राथमिक कर्तव्य असतांना सुद्धा पोलीस विभाग कर्तव्य पार पाडतात.हे एक आश्चर्यच आहे.
वरोरा तालुक्यातील बोरी नदीपात्रातील कारवाही, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सर्वात मोठी कार्यवाही वरोरा तालुक्यातील बोरी नदीपात्रातील कारवाही, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सर्वात मोठी कार्यवाही Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.