संविधान दुगानेच्या पाठपुराव्याला यश, बिलोलीला मिळाली नविन अग्निशमन बंब

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (२३ ऑक्टो.) : नांदेड जिल्ह्यातील बिलोली हा सर्वात जुना व मोठा तालुका असून स्वातंत्र्याच्या ७४ वर्षात अग्निशमन बंब खरेदी करता आले नव्हते परिणामी बिलोली व परिसरात अनेक आगीच्या घटना घडल्या अनेकांची घरे,दुकाने इतकेच नाही तर अग्निशमन बंब च्या अभावी आगीमुळे शेतकऱ्यांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.या सामाजीक प्रश्नांची जाण असणाऱ्या इंडियन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांनी ४-५ वर्षांपासून सतत शासनदरबारी पाठपुरावा करून बिलोली नगर परिषदेच्या गाळा लिलावातून मिळालेल्या रकमेतून किंवा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)यातून बिलोलीसाठी कायमस्वरूपी अग्निशमन बंब ची मागणी करून वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ही मार्ग अवलंबविला होता.याचीच फलनिष्पत्ती म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)२०२१ अंतर्गत बिलोली नगर परिषदेसाठी नवीन अग्निशमन बंब खरेदी करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
            
या पूर्वी बिलोली व परिसरात अचानक पणे लागलेली आग विझविण्यासाठी धर्माबाद, देगलूर किंवा नायगाव हुन अग्निशमन दल उपलब्ध होइपर्यंत आग मोठया प्रमाणात पसरून पंचायत समिती समोरील सुशिक्षित बेरोजगारांची दुकाने,खुशी ऑटोमोबाईल जळून जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.परंतु आता उपलब्ध झालेल्या अग्निशमन बंबमुळे भविष्यात आगीपासून होणारे नुकसान यांवर काही प्रमाणात का होईना प्रतिबंध घालता येणे शक्य झाले आहे.या गाडीचे नांदेड येथे टेस्टिंग चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच बिलोली येथे ही गाडी दाखल होणार आहे.
         
भारतीय संविधानाच्या अनुछेद २४३ झेड डी च्या तरतुदीचे अनुपालन करून संबधीत नगर परुषदेची तितकी आवक नसल्यास जिल्हा नियोजन समिती हातभार लावू शकते.जिल्हयातील पंचायतीने आणि नगर पालिकेने तयार केलेल्या योजना व गरजा विचारात घेऊन संपुर्ण जिल्ह्याकरिता विकास योजनेचा मसुदा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे हे प्रमुख कार्य बिलोलीसाठी अग्निशमन बंब खरेदी करून आपले कार्य पार पाडल्या बद्दल संविधान दुगाने यांनी जिल्हा नियोजन समितीचे आभार मानले आहेत.
संविधान दुगानेच्या पाठपुराव्याला यश, बिलोलीला मिळाली नविन अग्निशमन बंब संविधान दुगानेच्या पाठपुराव्याला यश, बिलोलीला मिळाली नविन अग्निशमन बंब Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.