सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२३ ऑक्टो.) : यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्येच्या घटना त्याज्या असतानाच केळापूर तालुक्यातील मौजा भाडउमरी येथील आकाश शंकर हामंद युवा शेतक-याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे "बँक ऑफ महाराष्ट्र" पहापळ शाखा व्यवस्थापक यांचे विरोधात पात्र असताना कर्ज नाकारल्याने कार्यवाही करून कर्ज पुरवठा करून देणे अथवा आत्महतेची परवानगी दया असा 6 ऑक्टोबरला तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा प्रशासनाकडून बँकेवर कार्यवाही करण्यास विलंब होत असुन प्रशासन नुसते कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे.
यंदाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यात मुजोर बँक शाखा वेवस्थापक शेतक-यांच्या जीवावर उठल्या असून त्यांची आर्थिक कोंडी करून अडचणीत आणून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करीत आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली नसल्याने गावठी सावकार शेतक-याला आपल्या दारात उभे करायला तयार नाही.
पिडीत शेतक-याला जिल्हाधिकारी यांचेकडून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा होती परंतु प्रशासन कागदी अहवाल नाचवण्यात धन्यता मानत असल्याने सदर शेतक-याच्या पदरी निराशाच आली आहे. पिडीत शेतक-याकडे ओलीताची शेती असुनही तो पैसा अपुरा असल्यामुळे काही करु शकत नाही बैंक कर्ज देत नाही.
प्रशासन न्याय मिळवून देवू शकत नाही अखेर पिडीत शेतक-याकडे आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने ठेवलेला नसल्याने पिडीत शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर आहे.
केळापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने मागितली जिल्हाधिकारी कडे आत्महतेची परवानगी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2021
Rating:
