टॉप बातम्या

मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडुंची विदर्भ महा - लीग कबड्डी स्पर्धेकरीता निवड

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२३ ऑक्टो.) : येत्या नोव्हेंबर महिण्यामध्ये होणाऱ्या विदर्भ महा - लीग कबड्डी स्पर्धेकरीता पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महा- लीग निवड चाचणीमध्ये सदर निवड करण्यात आली आहे. कु. अश्लेशा रत्नाकर वसाके, कु. वर्षा सुरेश तलमले, कु. दामिनी मोरेश्वर महाजन या तिन महिला खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.

पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळामध्ये दैनदिन कबड्डी, खो खो,  कुस्ती व लाठीकाठीचे प्रशिक्षण व सराव सुरु असते. या मंडळाच्या अनेक खेळाडुंनी आज पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहे. यातील कु अश्लेशा वसाके व कु वर्षा तलमले यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसह अमरावती विद्यापीठ संघाचे सुध्दा प्रतिनिधीत्व याआधी केले आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय विदर्भ अॅम्युचुयर कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेन्द्र ठाकुर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, स विश्वनाथ झिंगे, अभय राउत, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मदन जिडेवार, मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, संचालक गणपत डोंगरे यांना दिले आहे. वरील तिनही खेळाडुस सुनिल कोपुलवार, अशोक कुमरे, रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील खेळाडुंचे मंडळाचे सदस्य राम कुमरे, ओमेश दर्शनवार, नितेश अक्केवार, अजय कुमरे, रितेश मुप्पीडवार, पंकज भेंडाळे, अभिजीत जाधव, धिरज रेड्डीवार, शुभम हामंद, सुकेश बत्तलवार, पवन मेश्राम, हर्षद शेख, अनिकेत दुधबडे, जॉली जाधव, साक्षी बेतवार, भुमी जेंगटे, पायल गाउत्रे, पलक वसाके, खुशी ठाकुर, वेदीका व्यास, किरण चव्हाण, दिया कुमरे, समिक्षा मडावी, चैताली कनाके, अनु वाढई आदिंनी अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post