टॉप बातम्या

वराेरा महिला तहसीलदार राेशन मकवाने यांनी केला अखेर "त्या" कर्मचा-यांचा पगार बँकेत जमा !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२२ ऑक्टो.) : कुठलेही ठाेस कारण नसतांना चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा येथील महिला तहसीलदार राेशन मकवाने यांनी काेतवालांचे मानधन तथा प्रामाणिकपणे काम करणां-या पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचे सणासुदीच्या दिवसात वेतन राेखले हाेते. चाैकशी अंती जिल्ह्यातील इत्तर तालुक्यात सर्वांचे पगार वेळेवर झाले हाेते. दरम्यान, या बाबतीत सातत्याने या बातमीचा पाठपुरावा "सह्याद्री न्यूज" नेटवर्कने केला हाेता. अखेर काल दुपारी काेतवाल यांचे मानधन, तसेच पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचे पगार बँकेत जमा झाल्याचे वृत्त नुकतेच प्राप्त झाले आहे.

या वेतन विलंब प्रकणामुळे सध्या वराेरा तहसील कार्यालयाचे नांव चंद्रपूर जिल्ह्यात बरेच चर्चेत आले आहे.
Previous Post Next Post