सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१८ ऑक्टो.) : वणीची ग्रामदेवी माँ जैताईच्या कृपेनें नवरात्रीची पहिली माळ... माझ्यासाठी अवर्णनीय आनंदाची. . स्वप्न सत्यात उतरवणारी... साहित्य प्रवासातला पहिलावहिला माझा स्वरबिंदू काव्यसंग्रह गोंडस रूपात हाती आला.
आनंद यात्री बनून जगण्यातली मजाच काही औरच असते नाही का .. शांत एकांत प्रत्येकाला हवाहवासा वाटतोय.. अशाच चैतन्यदायी प्रवासात मधुर मधुरम क्षणी ..स्वरांगणात रमत रमत,आपसुकच ओठी गुणगुण येते... कधी भावगिते, भक्तीगीते कधी चित्रपट गीते.. भाषेला तर बंधनच नसते.. त्यावेळी... स्वरांची मोहरणारी तान..मन झंकारून टाकते आणि भान हरपून जातं .. मनमोर नाचू लागतो.. धुंद, तल्लीन होऊन जातं ... नानाविध काव्यप्रकार ... उत्स्फूर्त नादमय,जादूमय कल्पनेचे लयबद्ध, वृत्तबद्ध स्वरूपातले "स्वरबिंदू" माझ्या ओंजळीत संग्रहित झाले ... आणि आपल्या सर्व वाचकांना ते सुपूर्द करताना मला फार आनंद होत आहे.
या संग्रहाला प्रसिद्ध कवी गझलकार हेमंत राजाराम डोंबिवली यांची प्रस्तावना लाभली आहे. व्याकरणचार्य चारुदत्त मेहरे यांनी ब्लर्ब
साठी लिहून दिले. तर सुंदर मुखपृष्ठ कवी, चित्रकार साईनाथ फुसे यांनी दिले.स्वयं प्रकाशनचे शुभानन चिंचकर यांच्या सहयोगाने हे सर्व शक्य झाले.
वाचकांनी हे स्वरबिंदू हवे असल्यास
ISBN number 978-81-951615-5-3
7767894004 या नंबरवर
फोन पे करून मिळवू शकतात
स्मिता गोरंटीवार वणी जि. यवतमाळ(महाराष्ट्र)
"स्वरबिंदू" काव्यसंग्रह वाचकांच्या सेवेत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2021
Rating:
