पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१८ ऑक्टो.) : आज रोजी 
पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा,बस आगार व्यवस्थापक,तहसील कार्यालय पांढरकवडा,विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व शासकीय कार्यालयांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे कायदे विषयक जनजागृती करण्यात आले. त्यानंतर माणुसकीच्या भिंतींचे अनावरण करण्यात आले.या माध्यमातून गरजु व गोरगरीब लोकांना जुने कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवाणी न्यायालय केळापूर), प्रमुख उपस्थिती श्री सुरेश कव्हळे (तहसीलदार केळापूर) श्री. अनंत ताकर (आगार व्यवस्थापक) पांढरकवडा, नगर परिषद मुख्याधिकारी श्री राजू मोट्टेमवार, आरोग्य निरीक्षक संतोष व्यास, अधीक्षक विनोद अंबाडकर.विधी सेवा समिती तथा वकील संघ तर्फे श्री ॲड गजानन खैरकार, ॲड बिजेवार,ॲड पेटेवार आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी श्री बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवानी न्यायालय केळापूर) यांनी कायदे विषयक माहिती दिली तर तहसीलदार सुरेश कव्हळे साहेब यांनी विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पेटेवार यांनी केले तर आभार कनाके यांनी केले.
पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.