सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (१८ ऑक्टो.) : केळापुर तालुक्यातील कोठोडा येथे यवतमाळ जिल्ह्याचे
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी (ता.१३) ला भेट दिली, भेटी दरम्यान गावकऱ्यांसोबत गावफेरी करुन आदर्शगांव योजनेअंतर्गत व इतर योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली.
आदर्शगांव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष मा.पोपटराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शन व
प्रेरणेतुन आत्महत्या मुक्त झालेल्या कोठोडा या गावाला राज्यस्तराचे प्रथम उत्कृष्ट आदर्शगांव
पुरस्काराने सन्मानित झालेल्या गावामध्ये मा.अधिक्षक साहेबांनी एक तास गावकऱ्यांसोबत चर्चा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये स्व.सौ. शांताबाई भोयर ग्रामिण विकास बहु.संस्था बोथ या
संस्थेचे फिरोज खान इसाक खान पठाण (क्षेत्रीय तंत्रज्ञ, आदर्शगांव कोठोडा) यांनी आदर्शगांव
योजनेअंतर्गत शेतामध्ये झालेल्या बांध-बंधिस्त कामामुळे बारा माही सिंचनाची व्यवस्था उपलब्ध
झाल्यामुळे पिक उत्पादन व उत्पन्नात वाढ झाली तसेच गावातील सिमेंट काँक्रेट रस्ते, भुमिगत
नाली, डिजीटल अंगणवाडी, अद्यावत अभ्यासिका, व्यायाम साहित्य, प्राथमिक शाळेला साहित्य
तसेच फिरता निधीतुन गावातील एकुण १६ महिला बचतगटांना रु. ४,४२,०००/- देण्यात आले.
बिछायत साहित्य, दाळ मिल, शेवई मशिन व मालवाहतुक वाहन बचत गटांच्या स्वयंरोजगार
उभारण्यासाठी योजनेतुन देण्यात आले, नसबंदी, नशाबंदी, बोअरवेल बंदी, चराई बंदी, कुन्हाड
बंदी, लोटा बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे १००% पालन गावातील ग्रामस्थ करीत असल्याची
माहिती दिली.
शासनाच्या इतर योजनेतुन झालेली कामे व ग्रामस्थांनी लोकसहभागातुन केलेल्या कामाची
सविस्तर माहिती सभेमध्ये श्री.फिरोज खान इसाक खान पठाण व श्री.सुनिल दत्तात्रय पावडे (ग्राम
कार्यकर्ता) यांनी मांडली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी
मार्गदर्शन करतांना सप्तसुत्री पालन तसेच योजनेतुन झालेल्या गाव विकास कामाची प्रशंसा केली.
जिल्ह्यातील एकमेव गाव ज्या गावामध्ये मला आज भेटी दरम्यान खुप काही शिकायला मिळाले
हे माझे भाग्यच, तसेच गावाने केलेले कार्य यामुळे मला खुप काही माहिती आत्मसात करावयास
मिळाली, डिजीटल ग्रंथालय, डिजीटल ग्रामपंचायत, आर.ओ. फिल्टर अशा सर्व परिपूर्ण सुविधा
एका छोट्याशा गावामध्ये आहे ही प्रशंसेची बाब असुन आदर्शगांव योजनेचे श्री.भालेराव (कृषि
उपसंचालक) व श्री.गणेश तांबे साहेब (तंत्र अधिकारी) यांनी वेळोवेळी गावाला दिलेल्या भेटी व
सहकार्याबद्दल त्यांचे उत्कृष्ट कार्याचे मा.दिलीप पाटील साहेबांनी प्रशंसा केली. गावामध्ये अशाच
प्रकारचा एकोपा राहावा व पवार साहेबांनी कोठोडा गावाला आत्महत्यामुक्त करुन दिले त्याबद्दल
त्यांचे आभार मानुन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला विराम दिला.
या कार्यक्रमाला डॉ. अनिल कोंडबाजी भोयर (संस्था अध्यक्ष), सुनिल पावडे (ग्राम
कार्यकता), फिरोज खान इसाक खान पठाण (क्षेत्रीय तंत्रज्ञ, आदर्शगांव कोठोडा), प्रकाश
काकडे (ग्रामसेवक), किशोर धगडी (पोलीस पाटील), प्रदिप पाटील (उ.वि.पो.अधिकारी), रामकृष्ण महल्ले (जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी), जगदिश मंडलवार (पोलीस निरीक्षक पांढरकवडा), संदिप बारींगे (पोलीस उपनिरीक्षक),
संकल्प वाचनालयाचे चमु व प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्री.पवन जुमळे, आभार श्री. देवतळे (माजी कॅप्टन) यांनी मानले.
आदर्शगांव कोठोडा येथे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ(भा.पो.से.) यांची विशेष भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2021
Rating:
