भावपूर्ण श्रध्दांजली सर....

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वणी, (१८ ऑक्टो.) : अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावणारी घटना काल पुण्यात घडली. वन विभागातील एक अतिशय शिस्तप्रिय आणि तितकेच शांत ,प्रेमळ आणि अधीनस्थ कर्मचारी यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असणारे माझे मार्गदर्शक अधिकारी कै.राजकुमार पटवारी सर,सहा.वनसंरक्षक आज आपल्यात नाही,यावर विश्वासच बसत नाही... वन विभागात प्रदीर्घ सेवा देऊन सर नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. सतत कामात असणारे, कामाप्रती स्वतः ला झोकून देणारे अधिकारी म्हणून सरांचा नावलौकीक होता. खरं तर सर मूळचे लातूरचे पण वनक्षेत्रपाल म्हणून वन विभागात रुजू झाल्यापासुन सर विदर्भात कायमच रूळले, त्याचं मन विदर्भाच्या मातीशी घट्ट व एकरूप झाल अगदी शेवटच्या क्षणापर्यत,ते सेवानिवृत्त ही विदर्भात झाले. प्रत्येक अडचणीत सर कायमच मदत करत आले, माझे आणि सरांचे अतिशय जिव्हाळयाचे संबंध होते. सरांनी वनक्षेत्रपाल (RFO) असतांना देऊळगांव राजा, खामगांव,पांढरकवडा,वाशिम,पाटनबोरी, जोड्मोहा इ. अशा अनेक ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कामे केली, त्याबाबत स्थानिक नागरिक आजही आठवण काढतात. वणी कर नागरिक पटवारी तर सरांना कधीही विसरू शकणार नाही असे ऋण त्यांचे आहे आणि ते म्हणजे मंदर निसर्ग पर्यटन केंद्र (रोपवाटिका).. वणी हे अतिशय प्रदूषित शहर आहे आणि या धकाधकीच्या जीवनात मनाला उसंत मिळावी अस एकही ठिकाण वणी पासुन जवळ नाही, ही बाब हेरून पटवारी सरांनी मंदर रोपवाटिका व निसर्ग पर्यटन केंद्र स्वतः च्या कल्पकतेतून विकसित केल. त्यामुळे वणीकरांसाठी वणी पासुन जवळच एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण तयार झाल आहे, यात सिंहाचा वाटा अर्थातच पटवारी सर यांचा आहे, याकामी त्यांना तत्कालीन उप वनसंरक्षक पांढरकवडा श्री.जी.गूरूप्रसाद यांच खूप सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. त्याच बरोबर वणी येथील अनेक डॉक्टर, व्यापारी, सामाजीक कार्यकर्ते व नागरिकांच सहकार्य लाभलं. या सर्वांना एकत्र घेउन त्यांना एका धाग्यामध्ये जोडण्याच काम पटवारी सरांनी केलं. त्यामुळेच हे सुंदर ठिकाण आकारास येऊ शकलं..

आज अनेक लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर झरी तालुक्यातील वरपोड नावाचं एक छोटसा आदिवासी पाडा पटवारी सरामुळे प्रकाशझोतात आला. पुढे वणी येथील सुप्रसिद्ध डॉ.महेंद्र लोढा यांनी ते गांव दत्तक घेतलं त्यामुळे त्या आदिवासी बांधवांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला. सरांच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. शासन सेवेत राहून सामाजीक बांधिलकी जपत केलेलं सरांच हे काम माझा सारख्या अनेक तरूणाला नक्कीच प्रेरणादायीं राहिल. आणि या कामातच्या रूपात सर नक्कीच आमच्यात जिवंत राहील... पण सर तुमची उणीव आम्हाला नेहमीच भासेल..
सर स्वर्गात तुम्हाला चांगली जागा मिळो ईश्वर चरणी प्रार्थना...
भावपूर्ण श्रध्दांजली 
भावपूर्ण श्रध्दांजली सर.... भावपूर्ण श्रध्दांजली सर.... Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.