सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१८ ऑक्टो.) : गडचिरोली जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेन्द्र ब्राम्हणवाडे यांची नुकतीच निवड झाली आहे. दरम्यान नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे हे कुसुमताई अलाम यांच्या निवासस्थानी आशिर्वाद घेण्यासाठी आले असताना त्यांनी औक्षवंत करुन त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.
ब्राम्हणवाडे हे कमी वयातील गडचिरोलीचे पहिले जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ नेत्यांनी या पदावर त्यांची नियुक्ती केली ही अतिशय अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. एन.एस.यू.आय. पासुन तर लोकसभा अध्यक्ष या पदावर काम करीत असताना अथक परिश्रम करुन जनसेवेचे कार्य त्यांनी केले आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत काँग्रेस पक्षाची सत्ता नसताना अवघड परिस्थितीत काम करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. रक्तदान शिबिरे घेणे, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आलेले संकट असेल, त्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता धडपड केली आहे. कोरोना सारख्या महाभयानक व कठीण परिस्थितीत कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना भोजन सेवा देण्याचे महान कार्य देखिल केले आहे. जनतेच्या भावना, गरजा लक्षात घेऊन त्यांना ताबडतोब मदत करताना मी मदत करत असल्याचे त्याने कधी भासू दिले नाही.
मोर्चा,मेळावे,आंदोलने यात पुढाकार घेवून व काँग्रेस पक्षाचे ध्येय व धोरणे राबविण्यांत तत्पर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व गडचिरोली जिल्ह्याला लाभले असे म्हटल्यास ते अतिशाेक्तीचे ठरणार नाही. वरिष्ठांनी जी त्यांना जबाबदार दिली ती जुने, नवीन नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यांतुन यशस्वी पणे त्यांनी पार पाडून जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे मत कुसुम ताई अलाम माजी जि.प.सदस्य साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या बाेलण्यातुन आज व्यक्त केले. दरम्यान महेन्द्र ब्राम्हनवाडे यांचे नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेन्द्र ब्राम्हणवाडेंची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2021
Rating:
