कर्मचाऱ्यात निर्माण झाले संतापाचे वातावरण; एसडीओ सुभाष शिदेंना सादर केले पटवारी संघटनेंनी निवेदन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१८ ऑक्टो.) : काही दिवसां पूर्वी जगभरात महाभयानक काेराेनाचे सावट पसरले हाेते .त्याची झळ चंद्रपूर जिल्ह्याला देखिल पाेहचली हाेती.याच कठीण काळात महसुल विभागातील सर्व कर्मचा-यांनी स्वताच्या प्राणांची पर्वा न करता दिवस रात्र इमाने इकबारे त्यांचेवर वरिष्ठ अधिका-यांनी साेपविलेली जबाबदारी पार पडली. काहींच्या कामाचा गाैरव देखिल झाला.

काेराेना काळात वराेरा महसुल विभागाचे याेगदानही तेवढेच माेलाचे ठरले आहे. पटवारी, मंडळ अधिकारी व काेतवाल यांचे हे जाेखिमचे भरीव कार्य डाेळ्यां देखत असतांना व वराेरा तालुका सदैव महसुल कामात पुढे असतांना देखिल कुठलेही सबळ कारण नसतांना अवघ्या पंधरा दिवसांपुर्वि वराेरा तहसीलदार म्हणून रुजु झालेल्या राेशन मकवाने यांनी ऐन दसरा सणांपर्यंत बुध्दीपुरस्पर पटवारी, मंडळ अधिकारी व काेतवाल वर्गांचे मागिल महिण्यांचे मानधन न दिल्यामुळे या कर्मचारी बांधवात संतापाची लाट पसरली आहे. विशेष उल्लेखनिय बाब अशी की कर्मचा-यांचा दसरा सण आनंदात व उत्साहात साजरा व्हावा या साठी जिल्ह्यातील इत्तर तहसीलदारांनी दस-या पुर्विच तलाठी, मंडळ अधिकारी व काेतवाल यांचे वेतन व मानधन त्यांचे बँक खात्यात जमा केले आहे.
पंधरा पंधरा दिवसांपर्यंत वराेरा तालुक्यातील उपरोक्त कर्मचा-यांचे वेतन वेळेवर हाेत नाही .ही एक शाेकांतिकाच आहे. मागील महिण्यातील कर्मचा-यांचे वेतन महिला तहसीलदार मकवाने यांनी बुध्दीपुरस्पर केले नसल्याचा आराेप काेतवाल व पटवारी संघटनेनी केला असुन, आज सोमवार दि.१८ ऑक्टाेंबरला दुपारी वराेरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना विदर्भ पटवारी शाखा वराे-याच्या पदाधिका-यांनी व तलाठ्यांनी एक लेखी निवेदन सादर केले त्यात महिला तहसीलदार राेशन मकवाने यांनी मुद्दाम दस-याच्या सणाला मागील महिण्यातील वेतन न दिल्याचे स्पष्टपणे नमुद केले आहे.

पटवारी, मंडळ अधिकारी व काेतवाल यांना पाच तारखें पर्यत वेतन करावे हे शासनाचे जुणेच निर्देश व नियम असल्याचे समजते. पण या महिला तहसीलदारांनी या सर्व नियमांना बाजूला सारले असल्याचे एकंदरीत दिसून येते. काेतवाल व पटवारी संघटना यांनी दिलेल्या निवेदनाच्या बाबतीत एसडीओ शिंदे हे कुठला निर्णय घेतात या कडे जिल्ह्यातील सा-या महसुल विभागातील कर्मचा-यांचे लक्ष वेधले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे वेतन तीन तारखेच्या आतच झाले असल्याचे विश्वासनिय सुत्राने आमच्या प्रतिनिधीस आज सांगितले. परंतु या महिला तहसिदारांनी तलाठी, मंडळ अधिकारी व काेतवाल यांना १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेवून सुध्दा पगारापासून वंचित ठेवले. वरिष्ठ अधिका-यांनी या बाबतीत याेग्य चाैकशी करुन उपराेक्त कर्मचा-यांना न्याय द्यावा अशी मागणी पटवारी संघटनेनी केली आहे .दरम्यान जिल्हा पटवारी संघटनेचे युवा नेता तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे यांचेशी (उपराेक्त परिस्थिती जाणून घेण्या बाबत) आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेशी संपर्क हाेवू शकला नाही.  
कर्मचाऱ्यात निर्माण झाले संतापाचे वातावरण; एसडीओ सुभाष शिदेंना सादर केले पटवारी संघटनेंनी निवेदन कर्मचाऱ्यात निर्माण झाले संतापाचे वातावरण; एसडीओ सुभाष शिदेंना सादर केले पटवारी संघटनेंनी निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.