मा. आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड येथील रक्तदान शिबिराचे उदघाटन
सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (९ ऑक्टो.) : जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड, (GWEL) वरोरा आणि जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन,वरोरा याच्या माध्यमातून दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दान उत्सव दरम्यान आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भद्रावती आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे आदरणीय आमदार श्रीमती प्रतिभा ताई धानोरकर, यांच्या हस्ते ४ऑक्टोबर २०२१रोजी सम्पन्न झाला
सदर कार्य्रक्रमाला जीएमआर वरोरा प्लांट हेड श्री धनंजय देशपांडे, श्रीमती मेधा देशपांडे, अध्यक्ष समृद्धी लेडीज क्लब, श्री अभय चौधरी, (O&M) प्रमुख, आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर. येथील तांत्रिक अधिकारी, रक्तदान केंद्र, डॉ अनंत हजारे,यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास प्रामुख्याने उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी श्रीमती. प्रतिभा ताई यांनी रक्तदान शिबिराच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदानासाठी पुढे येण्याची विनंती केली. त्यांनी आपल्या भाषणातून विशेषतः कोविद -१९ या साथीच्या काळात रक्ताची अत्यंत गरज असल्याचे सांगितले व या कालावधीत रक्ताच्या कमतरतेमुळे व जास्त मागणीमुळे चंद्रपूर जिल्यात रक्ताची अत्यंत कमतरता निर्माण झालेली आहे त्यामुळे जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशन (जीएमआरव्हीएफ) च्या सीएसआर उपक्रमांचा गेल्या दहा वर्षांत जवळच्या सभोवतालची गावांमध्ये मोठया प्रमाणात वेगवेगळे उपक्रम राबवून एक चांगले उदाहरण आपल्या समोर उभे केले आहे. आणि विशेषत: गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि उपजीविका क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले आहेत. विशेषतः १० गावामध्ये ७५० हून अधिक घरांमध्ये वैयक्तिक शौचालये तयार करण्यात आले असून त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे गावे आता स्वच्छ आणि उघड्यावर शौचमुक्त झाल्याचे दिसून येत आहेत याचे सर्व श्रेय जीएमआर कंपनीस त्यांनी दिले याशिवाय १७ गावामध्ये १ वॉटर एटीएम प्लांट बसवून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने गावातील लोकांचे पाण्यामुळे होणाऱ्या साथीचे रोग प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ च्या साथी मध्ये जीएमआर कंपनीद्वारे दिलेल्या प्रतिसादाचाही उल्लेख केला विशेषतः सरकारी रुग्णालयात केलेली मदत तसेच अन्न पॅकेट्स, नास्ता, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलिंडर प्रदान केल्याबद्दल धन्यवाद दिले एवढेच नाही तर सरकारी आरोग्य यंत्रणेला ग्रामीण भागात आणि वरोरा शहरात लसीकरण करण्यात मदत केली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
या प्रसंगी श्री धनंजय देशपांडे यांनी सांगितले की GWEL च्या मध्येमातून दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहात दान उत्सव साजरा करण्यात येतो आणि GWEL चे प्रत्येक कर्मचारी आसपासच्या गावातील विद्यार्थी व गरजू व्यक्तीसाठी व त्यांच्या कल्याणासाठी यथोचित योगदान देतात. जी एम आर कंपनी द्वारे कर्मचारी तसेच कामगार वर्गासाठी दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिरे आयोजित केली आणि आजपर्यंत सुरुवातीपासून 1500 युनिट पेक्षा जास्त रक्तदान केले गेले आहे. त्यांनी उपस्थिनांना सर्व सीएसआर उपक्रमांची माहिती दिली आणि समाजाच्या कल्याणाकरिता GWEL आणि स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून दोन्हीच्या सहयोगाने विकासात्मक काम करण्यात येईल असे सांगितले. सर्व कामगारांना पुढे येण्याची संधी निर्माण करण्यासाठी आणि विशेषत: महामारीच्या या संकटात रक्त दान करून समाजाची सेवा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जेणेकरून समाजाच्या हितासाठी त्यांना योगदान देता येईल.
डॉ.अनंत हजारे, रक्त संकलन युनिट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या रक्तदान शिबिराचा भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आणि रक्तदानाचे महत्व पटवून दिले जे उच्च मूल्याचे आहे. त्यांनी विशेषतः कोविड परिस्थितीत रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
सहयोगी कर्मचारी आणि रक्षा टीमसह सर्व GWEL कर्मचाऱ्यांकडून 65 युनिट रक्तदानाच्या विक्रमी यशाने शिबिराचा शेवट झाला. सर्व रक्तदात्यांना रक्तदानानंतर सहभागाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटनाची
मा. आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड येथील रक्तदान शिबिराचे उदघाटन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
