शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर - पालकमंत्री अशोक चव्हाण


सह्याद्री न्यूज | अमोल टेकले 
मुदखेड, (९ ऑक्टो.) : राज्यातील महाविकास आघाडी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना त्वरित विमा,अनुदान मिळवून देण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

बारड ता मुदखेड दौऱ्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण ता ९ शनिवार आले होते. यावेळी शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख किशोर देशमुख तसेच शिवसेना शाखा प्रमुख अशोक देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी भा. च. स. सा. कारखान्याचे अध्यक्ष गणपत तिडके, तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्धवराव पवार, पंचायत समिती उपसभापती आंनद गादिलवाड, शाम टेकाळे, संचालक व्यंकट कल्याणकर, सुभाष देशमुख, माजी उपसभापती सुनील देशमुख, जि प सदस्य सविता वारकड, युवक काँग्रेसचे मदन देशमुख, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तम लोमटे, श्रीराम कोरे, दिलीप कोरे, संजय मुलंगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. नवरात्र महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने चव्हाण यांच्या हस्ते शितलामातेची महाआरती करून कोरोना संकटा सह बळीराजा वरिल नैसर्गिक आपत्ती संकट मुक्तीची आराधना करण्यात आली आहे. तर अपघातात निधन झालेले युवक तुळशीदास पुरी यांच्या घरी जाऊन अशोकरावांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी पुढील उदरनिर्वाहासाठी कुटुंब प्रमुखास आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

पालकमंत्री अशोक चव्हाण दौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जय हो चा नारा देत गाव पातळीवर अशोकरावांचे जंगी स्वागत करण्यात आले. ज्ञानदीप नगर येथे नरसिंग आठवले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. वीरशैव बांधवांच्या वतीने श्रीराम कोरे, संजय मुलंगे, यांच्या नेतृत्वाखाली शिवालय मंदीरात भव्य स्वागत करण्यात आले. राजराजेश्वराची आरती करुन बळीराजा वरिल नैसर्गिक आपत्ती संकट टळो यासाठी आराधना केली आहे तर लहुजी नगर येथे बालाजी लोणवडे यांनी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने मार्केट यार्ड मध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

गाव पातळीवरील विकासाला प्राधान्य दिले जात असून यामध्ये गाव पातळीवरील राजकारण, हेवेदावे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. बारड साठी अडीच कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख करताना त्या कामात स्थानिक पुढारीच अडथळे आणत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी आशोकराव देशमुख, श्रीराम कोरे, भगवान एमले, दीलीपराव कोरे,प्रभाकर भिमेवार गोपीनाथ कदम, दिलीप देशमुख, शेख युसूफ, गुलाबराव देशमुख, बाबूराव बिचेवार,काशीनाथ मुलंगे,वसंत लालमे,गजानन कराळे, कृष्णा देशमुख, नारायण पांचाळ, सूरज देशमुख, विनायक देशमुख, भगवान देशमुख, मनोज वसुमते, दिनकर देशमुख, मनोज देशमुख, सर्जेश देशमुख, विनोद कोरे, सदाशिव तांडे, यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर - पालकमंत्री अशोक चव्हाण शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर - पालकमंत्री अशोक चव्हाण Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.