सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (२१ ऑक्टो.) : वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमिताने अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे वतीने सर्व गुरुदेव सेवा मंडंळाना सुचित करुन कोरोना परिस्थिती लक्षात घेता या वर्षीही मागील वर्षी प्रमाणे च पुण्यतिथी साजरी होत आहे त्यामुळे उपासकांनी मोझरीला न येता आपआपल्या मंडळात गावीच हा सोहळा साजरा करावा आणि या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे कळविले त्या अन्वये वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराची सुरुवात दिपप्रज्वलन व संकल्पगीताने झाली. रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ श्री राठोड साहेब अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे हस्ते श्री अहतेशामजी अली नगराध्यक्ष वरोरा यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी अ.भा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, श्री छोटुभाई शेख सभापती न.प.वरोरा, डॉ श्री शेन्डेसाहेब, श्री चंदनलालजी शर्मा जीवनप्रचारक, लक्ष्मण कातोरे, यांचे प्रमुख उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रम वरोरा येथे दि. २१/१०/२०२१ ला पार पडले. शासकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टर व त्यांची चमु मा.संजय गावीत, मा.उत्तम सावंत, मा.रोषण भोयर, मा.मनोज घोळके, मा. चेतन वैरागडे यांनी रक्त दानाची व्यवस्था केली. या प्रसंगी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आजचा परिस्थितित रक्ताची किती गरज आहे हे पटवून दिले व गुरुदेव सेवा मंडळातिल सर्व सदस्यांचे रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल खुप खुप आभार मानले आणि सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा रुपलाल कावळे, लक्ष्मणराव गमे, नंदकिशोर खिरटकर, अविनाश पिंपळकरसर, मनोहरराव पारोधेसर, अशोकराव वैद्य मुख्याध्यापक, चंदशेखर कानकाटे, अशोकराव ठेंगे मध्यवर्ती प्रतिनिधी, धनंजयराव कोहाडे, झुरपुडे, कादर शेख, पुंडलीक राव कवरासे, दानविर वैरागी श्री आंबोरकर तसेच गुरुदेव सेवामंडळाचे सर्व उपासकांनी याकरिता ता अथक परीश्रम घेतले. या कार्यानिमित्ताने श्री जयंतराव पहापळे प्रतिक्षा नगर मुंबई यांचे कडुन रक्तदान करणाऱ्यांना तसेच सर्व मान्यवरांना त्यांच्या सौभाग्यवती स्व.सुहासिनी पहापळे यांचे स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीता भेट देणयात आली. तसेच त्यांचेकडून ५०० ग्रामगीता भेटस्वरुपात जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी देण्यात आले. यासर्व कार्यक्रमाचे संचालन प्रा रुपलाल कावळे चंद्रपूर जिल्हासेवाधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन. श्री अशोकराव ठेंगे यांनी केले.
वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 21, 2021
Rating:
