टॉप बातम्या

वीर बाबुराव शेडमाके यांचे पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !

 

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२१ ऑक्टो.) : आज दि. 21 ऑक्टोंबरला चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा लाेकनेते किशोर जोरगेवार यांचे घुग्घुस येथील (विद्या टॉकीज जवळील) जनसंपर्क कार्यालयात १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील विदर्भातील तथा आदिवासी समाजाचे शुर आद्य क्रांतिकारक वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुसच्या नितु जैस्वाल, माया मांडवकर, जनाबाई निमकर, माधुरी करमनकर, स्मीता कांबळे, रेखा सहारे, विना गुच्छाईत, यशोधरा पाझारे, आदीं महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Previous Post Next Post