सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२१ ऑक्टो.) : आज दिनांक 21/10/021 रोजी श्री राम मंदिर पांढरकवडा येथे गैप इन्क अर्थसहाय्य केयर इंडिया संचालित वुमन+वाटर प्रकल्पाअंतर्गत महिलांची व्यक्तिगत प्रगती व्हावी व त्याच्या जीवनातील सकारात्मक बदल होऊन त्यांनी न्यायिक जीवन जगावे त्यासाठी केयर इंडिया संस्थेद्वारे गावातील व्यक्तिगत प्रगतीनुरूप वेगवेगळ्या विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणारा प्रकल्प महाराष्ट्रातील ऑपरेशनला मॅनेजर रविकांत घाटोळ सर यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हा या दोन जिल्ह्यात सुरू आहेत. केयर इंडिया ही एक जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था असून जी शिक्षण, आरोग्य, उपजीविका व आपत्ती व्यवस्थापन या 4 मुख्य घटकावर कार्य करते.सध्या कोरोना महामारी सुरू आहेत, ज्या ज्या व्यक्तींनी केयर इंडिया संस्थेचे प्रशिक्षण घेतले आहेत. ते सर्व आपल्या जीवनात या प्रशिक्षणाचा उपयोग करतच आहेत परंतु लोकांमधील जे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज या कोरोना महामारीत पसरलेले आहेत ते सुद्धा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जनजागृती च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी करीत आहेत.
आज 21 ऑक्टोबर 2021 ला प्रशिक्षणार्थी पेस व मेल चॅम्पियन साठी इंटरफेस मीटिंग चे आयोजन राम मंदिर येथे करण्यात आले. ज्याचा उद्देश चॅम्पियन व येणाऱ्या लोकांसोबत चर्चा व्हावी व त्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत व्हावी. या मिटींगला नगराध्यक्षा वैशाली नहाते मॅडम, महिला व पाणी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे ओपेशनल मॅनेजर रविकांत घाटोळ सर, MEO सुनील मानकर सर, केळापूर तालुक्याचे क्षेत्र समनव्यक अमोल बोरकर व भूषण खडसे, प्रतिभा दुर्गे तक्रार निवारण केन्द्र समुपदेशक, अॅड किनाके, आयसीआय फाउंन्डर, सैनिक हिम्मत घोडाम, दैनिक लोकशाही वार्ता तथा सह्याद्री न्यूज (ई-पेपर) तालुका प्रतिनिधी रवि वल्लमवार, दैनिक लोकसूत्र चे सुरज बंडीवार, आशुतोष चौधरी, किरण बाराहाते, कविता जुमनाके, आशिया शब्बीर, महेंद्र कोडापे व केअर चे सर्व प्रशिक्षणार्थी इत्यादी व्यक्ती उपस्थित होते. हे करत असताना सोसिएल डिस्टनसिंग चे सुद्धा पालन केले गेले आहेत.