सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२२ ऑक्टो.) : पांढरकवडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत वांजरी शिवारात वाघाच्या हल्यात गुलाब कवडू कुंचलवार वय ४५ वर्ष या गुरख्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रात्री दोन वाजता शव सापडले.
बुधवार दिनांक २० ऑक्टोबर बुधवार रोजी पांढरकवडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत सुन्ना बिटातील वांजरी शिवारात गुरांच्या शोधात जंगलात एकटा गेलेल्या गुराखी गुलाब कवडू कुंचलवार याच्यावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यु झाला. बुधवारी गुलाब राखत असलेले गुरे एका शेतकऱ्याच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले यावरून दोघांत वाद झाला व त्या शेतकऱ्याने गुरांना कोंडवाड्यात टाकण्यासाठी नेले. यात गावकऱ्यांनी मध्यस्थी करून गुरांना कोंडवाड्यात टाकण्यापासून थांबविले. यात काही गुरे भरकटली. त्यांना शोधण्यासाठी गुलाब जांगलात एकटाच गेला परंतु उशिरापर्यंत तो घरी न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता वनकर्मचारी तात्काळ गावात पोहचले. वनकर्मचारी, पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर जंगल पिंजुन काढले व रात्री दोन वा च्या सुमारास गुलाब चे शर्ट दिसून आले तर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळाची पाहणी वरून व शरीरा वरील खुणा वरुन गुलाब चा वाघाच्या हल्यात मृत्यु झाला असल्याचे निदर्शनास आले.
गुरुवारी सकाळी उपवनसंरक्षण किरण जगताप यांनी गुलाब कुंचलवार च्या परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले व त्यांना शासन निर्णयानुसार मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती दिली. त्यानंतर मृत्यूदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. उपवनसंरक्षक यांच्या आश्वासन व शासनाच्या नियमावर विश्वास ठेवत उत्तरीय तपासणी नंतर मृत्यूदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला
"वांजरी गावात डॉ शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत समिती गठीत करण्यात आली असुन, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आराखडा तयार करण्यात येणार असून त्याकरिता २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नागरिकांनी जंगलात जाऊ नये, शेतात काम करीत असताना मोठ्याने आवाज करीत किंवा गाणे वाजवीत कामे करावी अशा प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे."
~ एम डी सुरवसे
वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा
वांजरी शिवारात वाघाच्या हल्यात गुराखी ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 22, 2021
Rating:
