राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर येत्या 29 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२२ ऑक्टो.) : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 ला दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून राज्य कर्मचाऱ्यांना परीभाषित अंशदायी योजना DCPS लागू केली. या योजनेचे रुपांतर सन 2015 पासून राष्टीय पेन्शन योजनेत NPS करण्यात आले. मागील 16 वर्षात या धारक कर्मचा-यांना जुनी पेन्षन योजना नाकारुन शासनाने सातत्याने अन्याय केला आहे. या योजनेतील राज्यातील सुमारे 1600 कर्मचा-यांचे दुःखद निधन झाले. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना तटपुंजी रक्कम मिळाल्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्थ झाले आहे. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतरही या कर्मचा-यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकरीता NPSरद्द होणे अतिशय गरजेचे आहे.
यासाठी सांप्रत महाविकास आघाडी सरकारने
1) NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी.
2)देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधीमंडळाच्या ठरावाव्दारे केंद्र शासनाला केली आहे. महाराष्ट् शासनाने सुध्दा अशी शिफारस तात्काळ करावी.
3) NPS धारक कर्मचा-यांना सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचा-यांप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान अनुज्ञेय करावे.
4) राज्यातील NPS धारक कर्मचा-यांना शासनाकडून मिळणा-या 14 टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी आणि
5) ऑक्टोंबर 2005 पूर्वीच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्विकारलेल्या तसेच नोव्हेंबर 2005 पूर्वी निवड होवून उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचा-यांना जुनी परीभाशित पेन्षन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देषाने या ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिय्या आंदोलनास जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी उत्स्फुर्तपणे 100 टक्के सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे, अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे व कोषाध्यक्ष संतोष अतकारे यांनी एका पत्रकातुन आज केले आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर येत्या 29 ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 22, 2021
Rating:
