सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (२२ ऑक्टो.) : 90 देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार कै.रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने 30 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केले आहे. त्याच दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आयोजित केली होती. देगलूर-बिलोली मतदार संघात परीक्षेचा कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम एकाच दिवशी असल्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा देणारे विद्यार्थी मतदान प्रक्रियेतून बाद होऊ शकतात ही बाब रिपब्लिकन सेनेची बिलोली तालुका अध्यक्ष गौतम गावंडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
देगलूर-बिलोली मतदार संघातून जवळपास 965 विद्यार्थी परीक्षेला बसले होते शिक्षक पात्रता परीक्षा व मतदान कार्यक्रम एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षा महत्वाची असल्यामुळे विद्यार्थी मतदान प्रक्रियेतून बाद होण्याची दाट शक्यता होती. म्हणून गौतम गावंडे रिपब्लिकन सेना बिलोली तालुका अध्यक्ष, महासचिव कपिल भेदेकर यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदना मार्फत विद्यार्थ्यांना टपाली मतपत्रिका द्या अशी मागणी केली होती.
टपाली मतपत्रिका छापण्यासाठी शासनाकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे सदर निवेदन शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे सदरील निवेदनाचा विचार करून शिक्षण मंडळाने दिवाळीनंतर 21 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षेची पुढची तारीख घोषित केली. ह्या केलेल्या मागणीबद्दल विद्यार्थी वर्गातून रिपब्लिकन सेनेचे यांच कौतुक होत आहे.
रिपब्लिकन सेनेच्या मागणीला यश अखेर टीईटी परीक्षा रद्द.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 22, 2021
Rating:
