सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (१५ ऑक्टो.) : येथील नगर वाचनालयात दि. १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अशा सच्च्या देशभक्ताच अनुसरण प्रत्येक भारतीयांनी केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर बोलतांना वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी या वाचन प्रेरणा दिनी प्रत्येकांनी किमान अर्धा तास वाचन केले पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. आभार संचालक अनिल जयस्वाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.
नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2021
Rating:
