सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२८ ऑक्टो.) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत म्हणून प्रति हेक्टरी १० हजार दिवाळीच्या आत देण्याचे आवाहन केले. परंतु झरी जामणी तालुक्यातील सहा मंडळापैकी खडकडोह आणि पाटण या दोन मंडळांना मदत मिळणार नसल्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. खडकडोह मंडळातील अकरा गावात शेतकऱ्यांनी सरसकट मदत मिळावी यासाठी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले.
यावर्षी मृग नक्षत्रापासून सुरुवाती पिकांच्या गरजे नुसार पाऊस पडाला. पोळ्यानंतर जोर पावसाचा वाढला सप्टेंबर महिन्यामध्ये सतत १७ दिवस पाऊस व त्यानंतर एकदोन दिवसाआड पाऊस झाल्याने गरजेपेक्षा पाऊस जास्त पडल्याने जमिन दलदली होवून कापूस तूर पिकाची वाढ रोखली पिक पिवळी येवून फळधारणा झाली नाही. पावसा अगोदर काढणीला आलेले सोयाबिन कापूस खराब झाला असतांना एकदा आठवडा पाऊस थांबला व पुन्हा पावसाने ऑक्टाेंबर मध्ये दि. १७ आक्टोंबर ५७.८ मिमी, दि.१८ ला १८.४ मिमी पाऊस पडला एकूण ८४८ मिमी पाऊस तालूक्यात पाऊस झाला.
अतिवृष्टीमुळे फुटलेला कापुस वारा व पावसाने खाली पडला झाडावरच्या लाही,कोंब फुटले. खाली पडलेला कापसाची तीच गत झाली असून, जमिनीवर पडलेला पराटी च्या झाडांचे चार सहा पाणी पुंजके आजही शेतात पाहायला मिळते. कापलेले सोयाबीन पावसात सापडले, गंजी केलेल्या सोयाबीन पावसात भिजले आणि उभ्या असलेल्या सोयाबीनला काढणे कठीण चाललेले आहे. प्रत्यक्षात अजूनही काही शेतात चिखल आहे.
महसूल विभाग : दोन मंडळ शासकिय मदतीपासून राहणार वंचित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 28, 2021
Rating:
