सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (११ ऑक्टो.) : नगर परिषद द्वारा संचालित स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यास गटाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक श्री नितेश कराळे सर उपस्थित होते. विद्यार्ध्यानी त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कथा आणि व्यथा त्यांनी याप्रसंगी मांडल्या. विद्यार्थी जोपर्यंत स्वतःच्या हक्काची लढाई लढत नाही तोपर्यंत समस्या सुटणार नाही. अतिशय विनोदी शैलीने तेवढेच मार्मिक विचार त्यांनी मांडले.
अवस्था बदलावायची असेल तर अवस्था आणि व्यवस्थेवर त्यांनी प्रखर भाष्य केले. यानंतर मा उमेश कोहराम स्टुडन्ट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनीसुद्धा आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाला नितेश कराळे, उमेश कोहराम, प्रदीप बोनगीरवर, दिलीप भोयर, प्रवीण खानझोडे, दीपक मोहितकर, वैभव ठाकरे, आनंद किनाके, विकास चिडे, मोहन हरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी नितेश कराळे सर आणि उमेश कोहराम यांचा शाल श्रीफळ देऊन अभ्यासगटाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे यांनी केले तर आभार आशिष खरवडे यांनी मानले.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यास गटात विद्यार्थ्यांना नितेश कराळे यांनी केले मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2021
Rating:
